पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उतरण.

१८१.

शक्ति १ शेर असेल, तर प शक्ति ५० फुटींतून खा लीं उतरेल आणि व वजन १ फूट उभें चढेल. इतर मूळ यंत्रांप्रमाणे उतरणीपासून जितका शक्तीचा नफा होतो, तितका वेगाचा तोटा होतो.

 रस्त्याचा कांहीं भागांत जी त्याची उंची असत्ये, त्यावरून त्या रस्त्याचा उताराची गणना करितात; उदाहरण, रस्त्याचा उताराचा २० फुटी लांबींत जर त्यास एक फुटीचा चढाव असेल, तर तो रस्ता २० फुटींत एक फूट चढतो असें ह्मणतात. जा टेकडी- चा चढाव २० फुटींत एक फूट असतो, त्या टेकडी- वरून जर चोडा गाडा ओढील, आ- कृति १३०, तर त्या गा ज्याचा वज- आकृति १३०. नाचा एक विसांश मात्र ओढावा लागेल; कारण जरी गाडा २० फुटींवरून जातो, तथापि तो १ फूट उंच चढतो.

 जर एक उतरण ६ ४ फुटी उंच आणि ६४ चे तिप्पट ह्मणजे १९१ फुटी लांब आहे, तर तिजवरून सोडिलेला गोल ६ सेकंदांत बुंधाशीं येईल; कारण गुरुत्वाचा योगानें तो पहिले सेकंदांत १६ फुटींतून जातो, व्यास २ होंचा वर्ग ह्मणजे ४ यांणीं गुणिलें असतां गुणाकार ६४ होतो, तो उंची बरोबर आहे, यावरून