पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मध्याकर्ष आणि मध्योत्सारी प्रेरणा - ग्रह.

११

पदार्थास पुढे अथवा सरळ रेषेत जाण्याची शक्ती देत्ये, तीस मध्योत्सारिणी प्रेरणा ह्मणतात.

 मध्योत्सारिणी प्रेरणा पदार्थास मध्यापासून दूर नेये, आणि मध्याकर्ष प्रेरणेसहित जेव्हां वरची प्रेरणा पदार्थावर लागू होत्ये, तेव्हां पदार्थास वर्तुळ चलन प्राप्त होतें. चलनयुक्त पदार्थावर दुसरी प्रेरणा न झाल्यास तो सारखे गतीनें सरळरेषेत जातो, असा जो पहिला चलन नियम त्यास अनुसरूनच वरची गोष्ट आहे.

 वर्तुळ गमनाविषयीं दृष्टांत ग्रह आहेत; त्यांतील एक चंद्र घेतला, तर त्याचे आंगीं सरळ रेषेत चाल- ण्याचा वेग आहे, आणि त्याजवर पृथ्वीचे आकर्षण आपणाकडे ओढण्याविषयीं निरंतर आहे, अशा दोन प्रेरणांनीं चंद्र वर्तुळांत फिरतो.

 तोफेतून निघालेला गोळा पृथ्वीचे आकर्षणामुळे वांकड्या रेषेनें पृथ्वीवर पडतो. जर पृथ्वीचें आकर्षण आणि हवेचा प्रतिबंध हीं दोन कारणें नसती तर तो सर्वकाळ सरळ रेषेत जाता.

 पाण्याने भरलेलें पात्र गोफणींत ठेवून ती गोफण हळू हळू फिरविली असतां, त्या पात्रांतील पाणी न सांडतां गोफण त्वरेनेंही फिरवितां येईल. जेव्हां पा- त्राचें मुख जमीनीकडे येतें तेव्हांही आंतील पाणी खालीं पडत नाहीं ; कारण कीं पाणी आपले आं- गचे जडतेने अथवा मध्योत्सारी प्रेरणेनें मध्यापासून दूर जाऊं लागतें आणि गुरुत्वामुळे पृथ्वीवर पडावें तें न पडतां पात्राचे बुडाकडे जाते. अर्धे घडलेले मडकें