पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय १२.
मळसूत्र.

 खरें ह्यटलें असतां मळसूत्र हैं साधें यंत्र नव्हे; कारण त्यास फिरविण्यास दांडा अथवा उच्चालक अ- सल्यावांचून, त्याचा उपयोग करवत नाहीं; दांड्याचा उपयोग केल्यावर पदार्थ दाबण्याविषयीं अथवा मोठीं वजने उचलण्याविषयीं तें मोठ्या सामर्थ्याचें मिश्र यंत्र होतें. उतरणीचा रूपभेद मळसूत्र आहे, हें समजण्या करितां अ कागदाचा तुकडा, १३३ व्या आकृतिप्रमाणें उ- तरणीचा आकारासारिखा कापावा, आणि तो ड दां- आकृति १३३. आकृति १३४ व 37 ड्यास गुंडाळावा, ह्मणजे त्याची व धार मळसू- त्राचें सर्पकृति सूत्र दाखवील. तो कागद दांड्या भोंवती असतां त्याचा आकार १३४ वी आकृति दा- खवित्ये. उतरण आणि पाचर यांत, वजन अथवा प्रतिबंध यांस त्यांचा सपाटीवर ठेवितात, त्याप्रमाणें मळसूत्राची योजना करित्येसमयीं, त्याचा सपाटीवर ह्मणजे सूत्रावर वजन अथवा प्रतिबंध ठेवित नाहीं. शक्तीचा व्यापार दुसऱ्या एका मळसूत्राचा योगाने लागू होतो, त्यास फिरकी अथवा चाकी ह्मणतात, आणि त्यांतून हें मुख्य मळसूत्र फिरतें. चाकी ह्मणजे