पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०
मळसूत्र.

एक पोकळ वाटोळी नळी असत्ये, तिचा आंतील बा जूस सर्पाकृति चीर असत्ये, तींत मुख्य मळसूत्राचे सूत्र बरोबर बसतें. या यंत्राचा योगाने शक्तिचा व्यापार प्रतिबंधावर लागू होण्या साठीं, मळसूत्र किंवा त्याची चाकी यांतून कोणतेही एक अचर असले पाहिजे. जर चाकी अचर असली, तर मळ सूत्राचा एका टोकांत जो उच्चालक घातला असतो, त्याणे तें मळसूत्र शेवटास जाईपर्यंत फिरविलें पाहिजे; आणि जर मळसूत्र अचर असले, तर त्याचा एक शेवटा- आकृति १३५. आकृति १३६. पासून दुसऱ्या शेवटाशी येईपा- वेत, ती चाकी उच्चालकाने फि रविली पाहिजे. १३५व्या आकृ तींत अ चाकी अचर आहे असें दाखविलें आहे. जर मळसूत्र सु- लटे फिरविल तर तें खालीं जातें असें दिसलें, परंतु चाकी स्थिर राहील. १३६ व्या आकृतीत मळसूत्र अचर आहे असें दाख- विलें आहे; त्याची न चाकी ल उच्चालकाने डाव्येकडून उजव्ये- कडे फिरविली असतां ती मळ- सूत्रावरून खालीं येईल. मळसूत्रा- पासून जो नफा होतो त्याची ग ना करिये समयीं दोन गोष्टींचा विचार केला पा हिजे, प्रथम, जा दांड्यावर मळसूत्र केलें असतें त्याचा