पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९२
मळसूत्र.

गेल हें पूर्वी दाखविलें आहे. कांहीं अवकाशांतून जाण्यास ३ इंच सूत्रांतराचा मळसूत्रास जितक्या वेळा फिरावें लागेल, त्याचा तिप्पट वेळा १ इंच सूत्रांतराचा मळसूत्रास त्याच स्थळांतून जाण्यास फि- रावें लागेल, असें वरची गोष्ट मळसूत्रास लागू के- ल्याने दिसेल. यावरून जा स्थळांतून गमन घडतें अथवा जो काळाचा तोटा होतो, तो नफ्याशी प्रमा- णांत असतो; यावरून ३ इंच सूत्रांतराचा मळसूत्रा पासून जो नफा होतो, त्याचा तिप्पट नफा १ इंच सूत्रांतराचा मळसूत्रापासून होईल.-

 उच्चालक न लावलेल्या नुसत्या मळसूत्राचें सामर्थ्य या पुढील रीतीनीं काढितां येईल. मळसूत्राचा परि- घास, जसें सूत्रांचा मधील अंतर प्रमाण, तसे शक्तीस वजन होईल. परंतु उच्चालका शिवाय या यंत्राचा क्वचित् उपयोग करितात, ह्मणून उच्चालकाचा बाहे रील टोकानें जो परिघ होतो त्यास मळसूत्राचा परि घाचा ठिकाणी घेतात. मळसूत्र आणि उच्चालक यांचा संयोग झाला असतां मळसूत्राचा खऱ्या शक्ती- ची गणना करण्याची असल्यास, उच्चालकाचा फिर- ण्यानें जें वर्तुळ होतें त्याचा परिघास शक्तीनें गुणावें, यावरून, शक्ति आणि तिचा फिरण्याचा परिघ यांचा गुणाकार, आणि वजन अथवा प्रतिबंध आणि दोन सूत्रांमधील अंतर यांचा गुणाकार, हे दोनही बरो- बर होतात.

 यावरून जर मळसूत्रास जोडिलेल्या उच्चालकाची