पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मळसूत्र.

१९३

लांबी, मळसूत्राचा सूत्रांमधील अंतर, आणि उचलाव- याचें वजन हीं ठाऊक असली, तर शक्ति किती ला- गेल याची गणना करितां येईल; अथवा एकादें मळ- सूत्र किती वजन उचलील हें जाणावयाचें असेल, तर शक्ति, सूत्रांमधलें अंतर, आणि उच्चालकाची लांबी यांचा ठराव प्रथम केला पाहिजे. जा मळसूत्राचा सूत्रांमधील अंतर अर्ध इंच आहे, आणि व्यास लाविले- ल्या उच्चालकाची लांबी फुटी आहे, यावरून त्या मळसूत्रानें किती नफा होतो याची गणना करितों. जर वर्तुळाचा परिघ काढण्याकरितां, त्याची त्रिज्या दिली असेल, तर त्या त्रिज्येस ६ नीं गुणावें, कारण वर्तुळाचा त्रिज्येचे ६ पटीपेक्षां त्याचा परिघ कांहीं- सा मोठा असतो, परंतु हे प्रमाण व्यवहारी कामास पुरेसें होतें, ह्मणून तो परिघ त्रिज्येचे ६ पट हेंच प्रमाण येथे घेतले आहे. वर सांगितलेला उच्चालक ६ फुटी आहे, ह्मणून त्याचा फिरण्याने जे वर्तुळ होतें त्याचा परिघ ६ फुटींस ६ नीं गुणिलें इतक्या बरो- वर, ह्मणजे ३६ फुटी अथवा ४३२ इंच आहे. परंतु एक फे-यांत मळसूत्र अर्ध इंच मात्र वर चढते, याव रून वजनाचा गमनस्थळाचा ८६४ पट फिरविणा- =ऱ्या शक्तीचें गमनस्थळ होईल; यामुळे या मळसूत्रा- पासून ८६४ नफा होईल ; अथवा उच्चालका १ शेर लागू केला असतां, मळसूत्राशीं ८६४ शेर तोलि- तां येतील. यावरून असा निश्चय होतो, की मळसूत्रा- चा यांत्रिक सामर्थ्याची वृद्धि करण्याचे दोन मार्ग आ-