पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मळसूत्र.

१९७

ह्मणून आंसाचा एक भाग दुसऱ्या पेक्षा जाडा केला आहे; त्याच कारणावरून वरची अडचण चुकवि- ण्यासाठी हंतर साहेबाने एक कुशळतेची युक्ति का ढिली आहे. या कल्पनेंत दोन मळसूत्रे असतात, त्यांतून एक दुसन्याचा आंत फिरते. जा दोन निर निराळ्या मळसूत्रांपासून हें मळसूत्र झाले असते, त्यां- चा सूत्रांचा अंतरांवरून याचा यांत्रिक सामर्थ्याचा विचार होत नाहीं, परंतु त्या दोन अंतरांचे वजाबा कीवरून घडतो. यावरून जर त्या दोन मळसूत्रांचा. आकृति १३९. सूत्रांचा जाडींत फार अंतर नसले, तर त्या सूत्रांस पाहिजे तितकी बळकटी व जाडी देतां येईल. १३९ ची आकृति तशा मळसूत्राची आहे. क मोठें मळसूत्र, न स्थिर चाकींत फिरतें. हे मोठे मळसूत्र पोकळ असते, त्याचा आंतील भाग चाकीप्रमाणे असतो, आणि त्या चाकीचीं सूत्रे म मळसूत्राचा सुत्रांशीं मि- ळतीं असतात; भार घालण्या- ची ब फळी जी खालीं वर फ होये, तीस हें धाकटें मळसूत्र बसविलेले असते. मळ- सूत्राचा प्रत्येक फेन्याने क पोकळ मळसूत्र आपल्या जवळ जवळचा दोन सूत्रांचा अंतराइतक्या स्थळां- तून खालीं जातें. म भरीव मळसूत्र आपल्या सूत्रांचा अंतराइतक्या स्थळांतून वर चढतें; यावरून ब फळी आणि