पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
घर्षण.

२०५

 ५ पदार्थ नुसते जमीनीवरून ओढावे त्याबद्दल ते चाकाचा गाडीवर घालून ओढावे.

 ६ जांस घर्षणचक्रे ह्मणतात त्यांचा उपयोग क- रावा; त्यांचा योगानें गुळगुळीत आंसाचेंही घर्षण कमी होतें; कारण त्या घर्षणचक्रांचा परिघांवर आंस राहतो, व तीं चक्रे त्या आंसा- बरोबर फिरतात. बाजूवरील १४१ व्या आकृतींत अ - साचें टोंक आहे, आणि जा घर्षणचक्रांवर तो आंस राहतो तीं ब आणि क चक्रे आहेत.
आकृति १४१. अ क  ७ जो पदार्थ ओढावयाचा असतो तो वाटोळ्या दांड्यांवर अथवा वाटोळ्या गोळ्यांवर ठेवून ओढावा. जसें, मोठें लांकूड ओढायाचे असले ह्मणजे त्याज- खालीं वाटोळीं लांकडें घालून ओढितात, अथवा जेव्हां तोफेचा गाड्यास सपाट बैठक असत्ये, तेव्हां त्याचा- खालीं वाटोळे गोळे घालून तो गाडा फिरवितात. या दोन पक्षांत घर्षण अगदीं नाहीं; परंतु वाटोळे दांडे अथवा गोळे यांस पुढे चालण्यास जो भूमीपासून प्रतिबंध होतो, तितकाच मात्र आहे. जे सर्व अवयव एकमेकांवर घांसतात, त्यांत जीवांचा शरीरांतील एकमेकांवर घासणारे सांधे इत्यादि अवयवांची शक्ति, त्यांचा हालण्याची त्वरा, आणि अगणितपणा यांचा विचार केला असतां, त्यांत घर्षण फार थोडें आहे असे वाटतें. त्यांत जो या गोष्टीचा पूर्णपणा आहे, तो