पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०६
घर्षण.

आपल्या ध्यानांत येऊन आश्चर्य वाटतें, परंतु केवळ त्यांचा सारिखी कृति करितां येत नाहीं.

 घर्षणाविषयींचा सर्व गोष्टी चाकाचा गाड्यांपासून दिसून येतात; परंतु या लहान ग्रंथांत त्यांचें सविस्तर वर्णन करितां येत नाहीं. -

 घर्षण पावणाऱ्या सपाट्यांचा खरबरीतपणा आणि भाराची शक्ति हीं जशी असतील, त्याप्रमाणें घर्षणापा- सून प्रतिबंध होईल, असे मागील सर्व लेखावरून कळेल. दोनही सपाटी सारिख्या असून वजन दुप्पट केलें असतां घर्षणही दुप्पट होईल; वजन तिप्पट वाढ- विलें तर घर्षणही तिप्पट होईल; आणि हाच नि- यम पुढेही चालेल.

 पदार्थांचा एकत्र होणाऱ्या सपाट्यांचा विस्ताराप्र- माणेच केवळ घर्षणापासून प्रतिबंध होत नाहीं, असें प्रत्यक्ष अनुभवावरून कळलें आहे; परंतु पदार्थांचा जाती आणि वजने हीं सारिखीं असतां जा सपाट्या परस्प- रांवर घांसतात, त्या लहान किंवा मोठ्या असल्या तरी घर्षणापासून जो प्रतिबंध होणार, तो दोहोंपक्षीं सारि- खाच होईल. उदाहरण, एक लांकडाचा तुकडा दुसऱ्या सपाटीवरून घांसत जातो, त्याची एक बाजू ४ इंच चौरस आहे आणि त्याची धार एक चतु- यश इंच चौरस आहे, त्यास मोठ्या बाजूवरून किंवा अरुंद धारेवरून ओढिला तरी घर्षण सारिखेंच हो - ईल; ही गोष्ट या पुढील हिसाबापासून स्पष्ट दिसेल. अशी कल्पना करावी कीं त्या तुकड्याचें वजन ४