पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१०
घर्षण.

सून, ह्मणजे मध्यापासून लांब अंतरावर दोर लागू हो - तो आणि यामुळे घर्षणाचा मोड करण्याची शक्ति त्याचा आंगीं अधिक येत्ये. -

 आंसास खिळलेल्या चाकाचा आधारावर सर्व यंत्रा- चा आणि त्याचा योगानें जें वजन उचलावयाचें, त्याचा भार त्यावर पडतो; यामुळे त्या यंत्रांत घर्षण फार उत्पन्न होतें; असें आहे तरीं चांगल्या युक्तींनीं ही अडचण दूर होये. -

 उतरणींत घर्षणासाठीं पुष्कळ सूट द्यावी लागत्ये, तेणेकरून त्या यंत्राचा नफ्याविषयींचे गणितांत फार फेर पडतो. -

 पाचर आणि मळसूत्र यांत घर्षण अतिशय घडतें, यांतील चलन पावणाऱ्या सपाट्या अगदी जवळ जवळ असतात, यामुळे त्यांस संभाळण्यास मोठी सावधगिरी ठेवावी लागये. -

समाप्त.