पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
द्वितीय चलन नियम.

पदार्थाचा चलनाची जी दिशा होत्ये ती आणि मिश्र चलन या दोन गोष्टी द्वितीय चलननियमांत येतात ह्मणून हा फार अगत्याचा आहे.

 जर दोन सारिखीं वजनें, अथवा कोणत्येही जाती- चा दोन सारिख्या प्रेरणा समोरासमोरचे दिशेंत एकादे पदार्थावर घडल्या, तर तो पदार्थ स्थिर राहील; यास दृष्टांत, तराजूचा दोनही पारड्यांत एक एक शेराचें वजन घातलें असतां तीं पारडीं स्थिर ह्मणजे समतोल होतील; कारण समोरासमोरचा दिशांत समान प्रेरणा लागू होतात, यामुळे या उदाहरणांत तुलना घडत्ये, आणि अशा प्रेरणा लागू केल्यानें जी तुलना घडत्ये तिचा विचार करण्यास ही गोष्ट प्रेरक आहे. जास प्रेरणोपपादकचौकोन ह्मणतात, त्याचा हा पुढील कृतिसहित दृष्टांत आहे, आणि या चौकोनाचा यो- गाने चलन उत्पन्न करणाऱ्या प्रेरणांतून एक एकीचें फळ काढतां येतें, तसेंच त्यांचा समुच्चयाचें फळही का- ढितां येतें, ह्मणून हा प्रेरणोपपादक चौकोन यंत्रशा- खांत फार अगत्याचें मूळ कारण आहे.

कप्पीचा चाकासारिखीं दोन लहान चाके इ, फ, ( आकृति २ ) आकृति २. स इव एका उभ्या फळ्यास बशीव, इ क अ आणि एका दोरीचा टोंकांस ब, क, वजने बांधून ती दोरी त्या चाकांवरून सोड. नंतर दोन चाकांमधले दो-