पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रेरणोपपादक चौकोन.

१५

रिस कोठे तरीं ह पासून दुसरें एक अ वजन टांग, असें कीं तें त्या दोरीस खाली ओढून इह फ कोन क रील, आणि पहिल्या वजनांस तोलून धरील त्यांचे या स्थितीवरून हैं उघड आहे कीं, अह दिशेत लागू होणारे अ वजन हइ आणि हफ दिशांत लागू हो गाय ब आणि क वजनांस तोलून धरील आणि या दोन प्रेरणा अ वजनाचे बरोबरीचे प्रेरणेचे बरोबर असाव्या आणि त्यांची दिशा ह पासून वर असावी. या वजनांतून प्रत्येकाचें फळ काढायासाठीं जा फळ्यावर तीं चाकेँ आहेत, त्यावर अह दोरीचा रेषेंत ह बिंदू- पासून वरचे बाजूस हम रेघ कर. आणि हइ, हफ दोऱ्यांखालींही फळ्यावर रेघा कर ; नंतर हम रेघेंत सबिंदू घे आणि अ वजनांत जितके तोळे असतील तितके इंच सह रेघेत आहेत असें मान. हम रेघें- तीस बिंदूपासून सव रेघ, अफ रेघेशीं समांतर आणि सन रेघ ह इशीं समांतर काढ. नंतर ह्या झा- लेल्या समांतर चौकोनाचा हव, हन बाजू मोजल्या तर, ब वजनांत जितके तोळे आहेत तितके इंच हव रेघ भरेल, आणि क वजनांत जितके तोळे आहेत तितके इंच हन रेघ भरेल. या दृष्टांतांत तोळे आणि इंच हे वजनाचे आणि लांबीचे भाग दाखविण्यास घेतले आहेत; परंतु प्रत्येकाचे वजन आणि लांबी दुस- ये कांहीं वजनाचे आणि लांबीचे जातीची घेतल्यास चिंता नाहीं, परंतु प्रत्येक पक्षीं सर्व रेघांस एकच