पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
वारा आणि भरती -पाति चालणारी होडी.

तर तो पदार्थ त्याच काळांत, त्या चौरसाचा अथवा समांतर चौकोनाचा कर्णावरून समचलनानें चालेल."

 जा प्रेरणा समांतर चौकोनाचा बाजूवरून चलन उत्पन्न करितात त्यांस शुद्ध प्रेरणा ह्मणतात; जी एक- टी प्रेरणा कर्णरेघेंत चलन देव्ये, तीस परिणामरूप प्रेरणा ह्मणतात; आणि कधीं कधीं तीस बरोबरीची प्रेरणा असेंही ह्मणतात.-

 आणि जी प्रेरणा एका रेषेंत चलन उत्पन्न करित्ये ती दोन अथवा अधिक प्रेरणांपासून झाली आहे असें- ही मनांत आणितां येईल. या गोष्टीचा प्रत्यय पा- ण्याचा पाटांतून घोडे ओढून नेतात अशा होडीवरून होतो; प्रत्येक घोडा दोरीचा दिशेत होडी आपल्या- कडे ओढितो; परंतु होडी दोघांकडे जाऊं शकत नाहीं, ह्मणून तिचें खरें चलन या दोन प्रेरणांचे मि- भ्राचें फळ आहे.-

 यासच प्रेरणकीकरण ह्मणतात. जा दोन प्रेर- णांचा दिशा आणि वेग घोड्यांचा शक्तींनी दर्शविले आहेत, त्या दोन प्रेरणा मिळून एक प्रेरणा झाली असे ह्मणतात, ती एक प्रेरणा या उदाहरणांत होडीचा चलनाने दाखविली आहे. -

 पुष्कळ प्रेरणा एककाळी घडल्या असतां, चलन उत्पन्न करितात याविषयींचीं उदाहरणें सृष्टींत असंख्य आहेत. वारा आणि भरती या दोन प्रेरणांनी चाल- णारें तारूं, याविषयाचे एक उदाहरण आहे. जेव्हां वेगरहित नदींतून नाव एक तिरापासून दुसऱ्या तिरा-