पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
शिडावर वान्याचे फळ.

आहे, आणि दुसरी, कण्याशीं लंबरूप दिशेत ह्मणजे तारवाचे रुंदीचा दिशेत आहे; ह्मणून डन प्रेरणा मात्र तारवास पुढे लोटत्ये आणि दुसरी डम बाजूत नेत्ये; तारवाचा आकृतीवरून हे उघड दिसतें कीं कण्याचा . दिशेतला वेग, बाजूवरील ड म दिशेंतल्या वेगापेक्षां कार अधिक आहे. या बाजूचा जाण्यास दमाण ह्मणतात.

 या वर्णनावरून हे उघड आहे की जो वारा गल- बताचा मार्गास बहुतकरून आडवा आहे, तो वारा शि- डाचा योगानें गलबतास पुढे चालवी असें करितां येईल. -

 एक अब होडी टस बाणाचा दिशेंत जात आहे, आणि आणि फ असे दोन पुरुष, तींत समोरासमोर बसले आहेत! जर इ पुरुष एक गोळा फकडे फेंकि- तो तर होडी चालत असली किंवा स्थिर असली तरी, तो गोळा इफ दिशेत चालतो असा
आकृति १४. फ अ दिसेल; जर होडी स्थिर असेल तर तो गोळा निखालस त्याच दिशेत जाईल, आणि जेव्हां ती चालती असेल, तेव्हां होडीचें पुढे चालण्यामुळे दुसरें चलन उत्पन्न होईल, तें त्या गोळ्यावर डइ दिशेत लागू होईल. जरीं तो गोळा इफ दिशेंत जातो असें उडिव- णारास दिसतें तरी मिश्र चलनामुळे त्या गोळ्याचे चलन इ क रेर्चेत होतें, कां कीं जी प्रेरणा होडीस ओ-