पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
गलबत आपटणे.

तो समानच आहे. ८०० शें खंडींचीं दोन गलबतें, जेव्हां समुद्रांत एकमेकावर आपटतात, आणि त्यांचे वेग ह्मणजे चलनपरिमाणें मारिखींच आहेत, तेव्हां प्रत्येकास जो धक्का लागतो तो धक्का त्या दोहोंतून एक स्थिर असून त्यावर दुसरें १६०० शे खंडींचें गलबत त्याच वेगाने येऊन आपटल्यानें जो त्यास धक्का लागेल, त्या- चे बरोबर होईल; अथवा जर एक ३०० खंडींचें आहे आणि दुसरें ८०० शें खंडींचें आहे तरीही धक्का स- मानच होईल, तथापि तो धक्का धाकत्र्याचानें सहन करवणार नाहीं. -

 समान आकाराचा आणि समान वजनाचा दोन होड्या पाण्यावर स्थिर आहेत, आणि त्यांचामध्यें अंतर ४ फुटी आहे, आणि जर एका होडींतील मनुष्य दुस- रीस दोरानें आपणाकडे ओढितो, तर त्या दोनही दोन दोन फुटी चालून एकत्र होतील; अथवा जेव्हां दोनही होड्या एकत्र असून तो मनुष्य दुसरीस आपल्या होडी- पासून दूर लोटतो, तेव्हां त्या होड्या समान अंतरावर दूर जातील; पुनः जर त्यांतून एक होडी दुसरीचा वजनाचा दुप्पट आहे तर ती होडी दुसरीचा निर्भे अंतरावर जाईल, यावरून जेव्हां पदार्थ परस्परांवर आ- पटतात असें दिसतें तेव्हां आघात आणि प्रत्याघात समान घडतात आणि ते परस्परांत विरुद्ध असतात. -

 वह्यांनी होडी चालविणे, पाण्यांत पोहणें, आणि उडणें या तीन व्यापारांत आघात आणि प्रत्याघात