पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
अनियताकार पदार्थांचा आघात.

नाहींसा होईल, आणि बाकीचा २ वेग अ आणि ब यांमध्ये वाटला जाईल ; ह्मणजे दोघांचा आंगांत १ वेग येईल, नंतर बची दिशा फिरून ते दोघे एकाच दिशेत १ वेगानें बम दिशेत चालतील.

 जर ते अ आणि ब समान वजनाचे पदार्थ एकाच दिशेत जात आहेत ( आकृति १८) आणि अचा वेग ६ आणि बचा वेग ४ आहे, तर अ जाऊन बला ध- रील, आणि आघात होत्ये समयीं, त्या दोघांचे वेग समान होत इतका आपल्यांतून अ, त्यास वेग देईल; ह्मणून दोन्ही पदार्थ एकाच दिशेत ५ वेगाने चालू होतील; अशाने अचा, १ वेग नाहींसा होऊन बला १ वेग अधिक मिळेल.
व अ C- CO म आकृति १८.  " विषम परिमाणाचे पदार्थ सम प्रेरणांनी प्रेरिले असतां त्यांचा आंगीं जे वेग उत्पन्न होतात ते त्यांचा प्रकृति परिमाणांशी उलट्या प्रमाणांत असतात," याचा अर्थ हाच कीं, जितकें, पदार्थाचें प्रकृति परिमाण अ- धिक असतें, तितका कमी वेग त्याचा आंगीं येतो. सम प्रेरणांनी प्रेरित अशा विषम परिमाणाचा पदा- र्थांचे वेग जरीं विषम असतात, तरी त्यांचे वेगाघात सम असतात; मागें लिहिल्याप्रमाणे, जा वेगाने एका- दा पदार्थ चलन पावतो, तो वेग त्या पदार्थाचा वज- नानें गुणिला अस्तां तो गुणाकार त्या पदार्थाचा वेगा- घात होतो ; यामुळें सम प्रेरणायुक्त विषम पदार्थ जरीं