पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वेगाघात - वेग.

३७

सम वेगाने चालत नाहींत, तथापि जा पदार्थावर त्यां- चा आघात होईल, त्यास ते समान प्रेरणा देतील.-

  जसें, अ पदार्थाचें वजन एक तोळा आहे, ( आकृति १९) आ- आकृति १९. अ० फ णि त्यास अब रेघेंत लोटिला आहे, आणि दुसऱ्या क पदार्थाचें वजन चार तोळे आहे, आणि त्यास कड रेघेंत वरचा इतक्या प्रेरणेनें लोटिला आहे, तर यावरून उघड दिसतें कीं, त्यांचे वेग विषम होतील, ह्मणजे अचा वजनाहून क वजन जितके अधिक आहे, तितका अ चा वेगाहून क चा वेग कमी होईल; कचें वजन अ चा वजनाचा चौ- पट आहे, यामुळे त्याचा वेग चौपट कमी होईल. या- वरून सहज लक्षांत येईल कीं, जर क पदार्थ फ स्थिर पदार्थावर आपटून जितका भार त्यावर घालील तित- काच भार अ पदार्थ इ वर आपटला असतांही घालील; याचे कारण हें आहे कीं, कचा आंगों वेग नाहीं परंतु त्याबदल त्याचा आंगीं अ हून अधिक वजन आहे, आणि अचा आंगीं वजन नाहीं त्याबदल त्याचे आंगीं कपेक्षां अधिक वेग आहे.-

 पदार्थांचे आपटण्यांत आघात आणि प्रत्याघात यां- ची समता दाखविण्याचें उदाहरण हें पुढे देतों.

 मातीचे अथवा दुसऱ्या कांहीं अनियताकार पदा- र्थाचे अ आणि ब सारख्या आकाराचे गोळे (आकृति