पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
वेगाघात - वेग.

आकृति २०. (२०) भाग केलेल्या क्षय कमा- णीचा मध्याशी पोचत अशा समान लांबीचा दोऱ्यांनीं टांगिले आहेत असें मनांत आण. जर ते निराळे केले, ह्मणजे अ एका बाजूवरचा ४ या अंकाजवळ नेला, आणि दुसऱ्या बाजूचा ४ या अंकाजवळ व नेऊन एककाळींच जर ते दोन्ही सोडून दिले, तर ते एकमेकावर समान वेगानें आपटतील, आणि परस्परांची शक्ति नाहींशी करून, आघात झाल्यावर ते स्थिर होतील. यावरून असें सिद्ध होतें कीं, जेव्हां समान आकाराचे पदार्थींचा आंगीं समान वेग असतात तेव्हां त्यांचा आंगीं समान शक्ति असले, कां कीं जर असें नसेल, तर जाचा आंगीं अधिक शक्ति आहे त्याचा गमनदिशेत, त्यांचा आघात झाल्यावर ते दोन गोळे एकत्र होऊन गमन करितील; ही गोष्ट या पुढल्या रितीनें सिद्ध करितां येत्ये. अ गोळ्याचें वजन व चा वजनाचा दुप्पट आहे असें मनांत आण, आणि अ ला ३ या अंकाशीं नेला, आणि बला दुसऱ्या बाजूवरचा ६ या अंकाशी नेला ; तर ते दोन्ही तेथून सोडिले असतां त्यांचे वेग ३ हींस ६ या प्रमाणानें होतील, आणि त्यांचे आकार २ होस १ या प्रमाणाने आहेत. यामुळे त्यांचा आंगची शक्ति समान होईल; कां कीं अ चा आकार २ आहे आणि त्याचा वेग ३ आहे, या दोहोंचा गुणाकार ६