पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय ४.
गुरुत्वाविषयी.

 सर्व पदार्थ निराधार सोडिले असतां त्यांस पृथ्वी- चा किंवा दुसऱ्या कांहीं पदार्थाचा आधार मिळेपर्यंत ते पडतात. हा चमत्कार पृथ्वीचा सपाटीवर, आणि तिजवरील सर्व अतिउच्च प्रदेशीं आणि अधःप्रदेशीं घडतो ; ही गोष्ट मेधांपासून पाऊस आणि गारा यां- चा पतनानें, आणि एकाद्या अतिशय ओंड खाड्यांत दगड टाकल्याने दृष्टीस पडत्ये प्रकृति स्वभावतः जड ह्मणून ती स्वतः चलन पावण्यास समर्थ नाहीं, यामुळे पृथ्वीवर पतन पावण्यास तिचा आंगी कांहीं शक्ति नाहीं; यावरून पदार्थाचे पतनास वास्तविक कारण कांही प्रेरणा असावी; त्या प्रेरणेस गुरुत्व ह्मणतात. यावरून पदार्थाचें पतन जा प्रेरणेने घडते ती गुरुत्व प्रेरणा आहे; गुरुत्व प्रेरणेपासून याशिवाय दुसरीं कांहीं कार्ये होत नाहींत अशी जर कल्पना केली तर, या व्याख्यानापासून गुरुत्वाचा शक्तीचा केवळ अपूर्ण बोध होईल, कां कीं त्या प्रेरणेपासून पुष्कळ चमत्कार आणि पुष्कळ प्ररकारचीं चलनें उत्पन्न होतात. यास दृष्टांत, नद्यांचे वाहणे आणि प्रवाही पदार्थात हलक्या पदार्थचें वर येणें हीं, जास आपण गुरुत्व ह्मणतों, त्याचींच फळें आहेत. धूर कधीं कधी हवेंत फार उंच चढतो असें दिसतें, याचे कारण, जा पदार्थांतून त्याचें गमन होतें,