पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
पतन पावणारे पदार्थ.

त्या गोलाचा मध्याकडे रेघा मारिल्या, तर तीं पारडीं लंबापासून किंचित् दूर जातील हे उघड आहे. परंतु जे पदार्थ अनुभव दाखविण्याकरितां घेतों, त्यांचे आकार पृथ्वीचा आकाराबरोबर ताडून पाहिले असतां त्यांचा तिर्यक्क्षणा इंद्रियगोचर होत नाहीं. -

 पतन पावणाऱ्या पदार्थांविषयीं. - एका स्थळापासून जड आणि हलके पदार्थ पडतांना पाहिले असतां, त्यांचे पतनाचे निरनिराळे वेग आपल्यास दिसतात : पहा बरें ! शिसे फार त्वरेनें पडतें, आणि कागद फार सावकास पडतो; ही गोष्ट त्या दोन पदार्थांचा भिन्न भिन्न वजनामुळे होऊं शकणार नाहीं, कां कीं पदार्थ- चा आंगीं जसें वर चढण्याचे सामर्थ्य नाहीं, तसेंच त्यांचा आंगीं खाली पडण्याचेही सामर्थ्य नाहीं, हा णून पदार्थ कांहीं औपाधिक प्रेरणेवांचून पतन पाव- णार नाहींत, आणि ती प्रेरणा पदार्थांचा प्रकृतिपरि- माणाशी प्रमाणानें असली पाहिजे; आणि जापेक्षां पदा- थींचा सर्व अवयवांवर गुरुत्वप्रेरणा सारखीच असत्ये, त्यापेक्षां कांहीं प्रतिबंधक कारण नसेल तर त्या अव- यवांचा भूमीवर पतन पावण्याचा काळांत कांहीं अंतर पडणार नाहीं, या कालांतरानें पतनाचें कारण हवेचा प्रतिबंध आहे, आणि ती प्रतिबंधकता शिशापेक्षां का गदावर अधिक आहे; असें असतांही जर कागद गुं- डाळून गोळा केला, तर हवेचा व्यापारास थोडा प्रदेश मिळेल, ह्मणून त्यास हवेचा प्रतिबंध पूर्वीपेक्षा थोडा हो- ऊन, तो अधिक त्वरेनें पतन पावेल.