पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आवूड साहेबाचे यंत्र.

४९

भागप्रमाणे मांडिलीं आहेत ; ड एक धातूची लववि- लेली सळई आहे, तिची लांबी र कडीचा व्यासापेक्षां अधिक आहे. जेव्हां या यंत्राचा उपयोग करायाचा असतो, तेव्हां व वजन खांबाचा टोकाशीं नेतात, नंतर ती कडी आणि स पट्टी हीं दोन्ही कांहीं इंच अंतरानें बस- वितात; नंतर व वजनावर ड सळई ठेवितात तेणेंक- रून तें खालीं येऊ लागते; जेव्हां तें वजन र कडी- पर्यंत येते तेव्हां त्याजवरील लहान वजन ड त्या कडी- वर राहतें, यामुळे अ आणि ब हीं वजने परस्परांशीं समान होतात. यावरून हेच लक्ष्यांत ठेविलें पाहिजे कीं, ब वजन र कडीजवळ येईपर्यंत त्याचे चलनास आणि खालीं पडण्यास केवळ ड वजनाचे गुरुत्व का- रण आहे, आणि त्या कडीशीं आल्यावर गुरुत्वाचा व्यापार जरीं बंद होतो, तरी या काळांत जो वेग ब वजनाचा आंगीं आला असतो, त्याचा योगानें तें वजन पट्टीशी येऊन पोचते. या यंत्राचा खरेपणाचें ज्ञान हो- ण्यासाठी अशी कल्पना केली पाहिजे की, पतन पा- बणारे पदार्थ लहान किंवा मोठे असोत, तथापि त्यांचे वेग बरोबर असताहेत असें मानितात, आणि जेव्हां हवेचा प्रतिबंध गणित नाहींत तेव्हां ही वरची गोष्ट घड असे मानतात. या कारणास्तव मोठ्ये ब वजनावर ठेविलेले ड वजन इतर सर्व पतन पावणाऱ्या पदार्थांचें उदाहरण आहे. मोकळेपणाने पडणान्या पदार्थांशीं मिळवून पाहिलें असतां व वजनाचे हळू पडणें हें त्याचें चलन केवळ सूक्ष्मपणानें मोजण्यास साधक