पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
आत्वूड साहेबाचे यंत्र.

आहे; कारण पतन पावणाऱ्या पदार्थाचा खऱ्या वेगाचे अनुमान व्हावे हा या यंत्राचा उद्देश नाहीं, परंतु वेगाचे वाढीचे प्रमाणाचें अनुमान व्हावे इतकामात्र याचा उप- योग आहे. यावरून हैं. सहज लक्ष्यांत येईल कीं, इतर पतन पावणाऱ्या पदार्थाचा पतन नियमांस अनुसरून पदार्थांचें पतन कितीही हळू असो तथापि व्यापासून कांहीं अंतर पडत नाहीं; आणि पतन का - ळाचा पहिल्या सेकंदांत जितकें पदार्थाचें पतन घडतें, त्या अंतरावरून सर्व अटकळी केल्या आहेत असें वर सांगितले. तर यावरून असा निर्णय करितां येतो कीं, पहिल्या सेकंदांत पदार्थ किती खालीं येतो हैं माहित असून, पहिल्या सेकंदांतील पतनापेक्षां दुसऱ्या, तिसऱ्या, चवथ्या, अथवा पांचव्या सेकंदांत त्याचे पतन किती त्वरित होतें हैं जर बरोबर कळेल, तर, पुढल्या सर्व सेकंदांत जा स्थळांतून तो पदार्थ पडेल त्याचें अनुमान करितां येईल. तेव्हां जर व वजन पहिल्या सेकंदांत कांहीं इंच पडतें, दुसऱ्या सेकंदांत दुसरे कांहीं इंच पडते आणि याप्रमाणे पुढेही होतें, असें घड्याळाचे सेकंद वाजविणाऱ्या आंदोलकाचा सहायाने कळून आले, तर वाढलेल्या पतनाचे प्रमाण बरोबर काढितां येईल, आणि तें प्रमाण दुसऱ्या पदार्थांचा पतनास सहज लावितां येईल; इतकाच या यंत्राचा उपयोग आहे. गुरुत्वप्रेरणेपासून पतन पावणाऱ्या पदार्थास किती वेग मि- ळतो, आणि प्राप्त झालेल्या वेगापासून किती वेग मिळतो हेंही या यंत्रानें समजतें; कां कीं गुरुत्व प्रेरणा पडणा-