पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३
आत्वूड साहेबाचे यंत्र.

पडतो; तिसऱ्या सेकंदांत त्याच अंतराचा पांचपट अंत- रांतून पडतो; चवथ्या सेकंदांत, त्याच अंतराचा सातपट अंतरांतून पडतो; आणि याचप्रमाणे पुढेही पडत जातो.

 गुरुत्वाचा व्यापार सर्व पदार्थांवर सर्वकाळ घडतो, आणि तो व्यापार पदार्थ स्थिर अथवा चालत असतां - ही तसाच असतो, ही गोष्ट पतन पावणाऱ्या पदार्थांचा वेगांवरून स्पष्ट होये, जे वेग पदार्थींचा सर्व पतन- मागीत समान वाढत जातात. जर एकादी प्रेरणा पदार्थावर निरंतर आणि समतेने घडत आहे, तर त्या पदार्थाचा वेग समवर्धमान होत जाईल, हे पुढील वि-. चारावरून स्पष्ट होईल.

 मनांत आण कीं एक अ पदार्थ गुरुत्वप्रेरणेचा योगाने चालू आहे, तेव्हां त्याचा वेग १ आहे, तर पुनः त्यावर तीच प्रेरणा दुसऱ्याने घडली असतां त्याचा आंगीं पहिल्या इतकाच वेग उत्पन्न होईल. यावरून तो पदार्थ २ वेगाने चालेल, आणि तिसऱ्या वेळीं ३ वेगानें जाईल, कारण कीं पूर्वी चे वेग नंतरचा प्रेरणांचा आघातांनी कमी होत नाहींत ; यावरून असा निर्णय होतो की, जर आघात बरोबर आहेत आणि ते सम- कालांतराने होतात, तर पदार्थाचें चलन समवर्धमान होईल आणि त्याचा वेग काळांशी प्रमाणांत होईल; ह्मणून जर एक पदार्थ कांहीं वेळपर्यंत समवेगाने चा लत आहे, तर जा स्थळांतून त्याचें गमन होईल, तें स्थळ, त्याचा गमन काळ आणि त्याचा वेग यांशीं प्रमाणांत होईल. एका पदार्थाचा गमनकाळ दाख-