पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
युद्धोपयोगी मेषमुख यंत्र.

इतका वेग येईल कौं, पडल्यावर त्याचा शरिराचा चुरा होईल.

 प्राचीन लोक युद्धोपयोगी मेषुखयंत्र कामांत आ- णीत असत, तें यंत्र शक्तिसंचय करण्याचें एक उदा- हरण आहे, त्या यंत्रांत एका मोठ्या लांकडाचा टों- कास पितळ किंवा लोखंड बसवून, तें लांकूड मार्गे पुढे लोटतां येईल, अशा तऱ्हेनें उंच स्थानापासून टां- गीत असत; नंतर पुष्कळ मनुष्यें लागून त्यास हल- वीत, आणि जेव्हा त्याचा आंगीं थोडेसा वेग येई तेव्हां, त्यास शहराचा भिंती किंवा तटबंदी यांवर सोडून देत, आणि या योगानें तीं पाडीत असत. पतन पावणाऱ्या पदार्थांचा वेग गुरुत्वाचा योगानें जसा उभ्या दिशेत वाढतो, तसा मनुष्यांचा योगाने या यंत्राचा वेगे आडव्या दिशेत वाढवित असत.

 लांकडाचे सोंटे जमीनीत पुरण्याचें यंत्र, अधःप्र- देशीं अथवा उभ्या दिशेंत शक्तिसंचय करण्या विषयींचें उदाहरण आहे. आाकृति २९. त्यांत एक कठिण लांकडाचा जड तु- कडा असतो, तो (आकृ ० २९) अ आहे; त्यास मोगर असें ह्मणावें, क आणि ब, खांबांत तो खालीं वर सरतो. जेव्हां एका- दा सोटा जमीनीत पुरावयाचा असतो, तेव्हां व चक्रास जो दोर गुंडाळिलेला असतो, त्याणे, त्या मोगरास खांबां- चा टोंकाजवळ नेतात, आणि कांहीं सोप्या युक्तीने