पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोटे पुरण्यार्थे यंत्र.

५७

त्यास ड आंकड्यापासून सोडवितात, तेणेकरून तो खालचा स सोट्यावर येऊन पडतो. मनांत आण कीं, मोगराचे वजन ५०० शेर आहे, आणि तो दर सेकं- दांत ८ फुटीप्रमाणें पडतो, यामुळे प्रकृतिपरिमाण आणि वेग यांचा गुणाकार, ह्मणजे ५००×८= ४००० या गावातानें तो मोगर पडेल; आणि त्याचा पड- ण्याचें स्थान जसे उंच असेल तसा त्याचा आंगीं वेगा- घात ह्मणजे सोट्यावर आपटण्याची शक्ति अधिक येईल. -

 जड पदार्थ पडत असतां जसे त्यांचे वेग सारिखे वाढत जातात, तसे ते चढत असतां त्यांचे वेग सारखे क्षीण होत जातात. जसें बुरुजावरून दगड पडला असतां जमीनीस पोंचत्ये समयों जितका वेग त्याचे आंगी येतो, तितका वेग त्या दगडास वर उडवित्ये समयीं दिला पाहिजे. ३० व्या आकृतींतील ड पदार्थास अ उतर- णीवरून व जवळ येण्यास जो काळ लागतो, त्या काळांत क स्थळा- जवळ पोचण्याचा वेग त्याचा आं- आकृति ३०. गीं येतो, ती क उतरणही त्याच उंचीची असावी ; आणि त्या दोन्ही उतरणी फारच गुळगुळीत असल्या, आणि हवेचा कांहीं प्रतिबंध नसला, तर तो पदार्थ क पर्यंत निखालस चढेल. घडियाळाचा आंदोलक कर- ण्यास आधार हेंच कारण आहे. -

 आंदोलक ह्मणजे एक गोळा दोरीचा अथवा ता-