पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आंदोलक.

५९

वींचा कौंसापेक्षां कमी होये. तथापि असे दिसून येतें कीं जरी आंदोलकाचे झोंके हळू होत जातात, तरी ४ पासून ४ पर्यंत, ३ पासून ३ पर्यंत अशे तन्हेनें जो- पर्यंत त्याचें हालणें अगदीं बंद होई तोपर्यंत, त्यास जा- ण्यास जो वेळ लागेल त्यांत कांहीं फेर पडणार नाहीं; कांहीं जातीचा वक्र रेषांत पदार्थ सारिखे झोंके खा- तात हें गालिलीओ याणें उघडकीस आणिलें. पाइसा शहरांतील एका देउळाचा तक्तपोशीपासून टांगलेल्या दिव्याचा हालण्याकडे त्याचें लक्ष गेलें. तेणेंकरून त्याचें मन या गोष्टीकडे लागलें; जा स्थळां- तून तो दिवा झोंके खात असे तीं स्थळें मनांत न आ- णितां तो समकाळांत झोंके खातो असें त्यानें तेथें पा- हिलें; यावरून त्याणे प्रत्यक्ष अनुभव घेतले तेणेंकरून काळाचा सारिखेपणाचा नियम स्थापिला गेला. -


________