पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वक्ररेषाचलन.

६३

जेल. क्षितिजरेषेत एक सेकंदांत १००० फुटी या वेगानें जाई अशा प्रेरणेनें जर एक तोफेचा गोळा मा. रिला आणि दुसरा दर सेकंदांत १०० फुटी वेगानें जाई असा मारिला, तर जितकी गुरुत्वप्रेरणा यावर घडेल तितकीच पहिल्यावर घडेल; यावरून त्या दो- होंचे समान काळांत, समान स्थळांतून पडणें घडेल. पुढे फेंकणारी प्रेरणा जशी असत्ये त्याप्रमाणे ते लांब किंवा जवळ पडतात; जर एकापेक्षां दुसऱ्यावर अधिक प्रेरणा घडली तर, जावर अधिक प्रेरणा घडली असत्ये तो दुसऱ्यापेक्षां अधिक लांब जातो, परंतु ते दोन्ही एक काळीच जमीनीवर पडतात, ह्मणजे एक थोड्या स्थळांत हळू चालून पडतो आणि दुसरा पुष्कळ जा- गेतून लवकर चालून पडतो.

 फेकिलेल्या पदार्थाचा गमनाने जी वक्ररेषा उत्पन्न होत्ये तीस परावला असें ह्मणतात; या सिद्धांतांत हवेचा प्रतिबंधाची गणना केली नाहीं, तथापि व्यवहा- री अनुभवांत तो प्रतिबंध फार दृष्टीस येतो.



________