पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
गुरुत्वमध्य-वांकडे बुरूज.

तार घालून तीस ओळंबा लाव, नंतर जी दिग्रेषा दा- खविली जाईल ती इ ड रेघ होईल, आणि या रेघेंत कोठे तरी गुरुत्वमध्य असावा; परंतु त्यास दोन स्थळे नसतात ह्मणून जा फ बिंदूंत त्या दोन रेघा परस्परांस छेदितात, तो बिंदु त्या फळ्याचा गुरुत्व- मध्य होईल.

 पदार्थाचा गुरुत्वमध्यास आधार मिळाल्यावांचून पदार्थ स्थिर राहू शकत नाहीं, ह्मणून एकाद्या पदा- र्याचा गुरुत्वमध्यापासून पृथ्वीचा मध्याकडे काढिलेली रेघ जर त्या पदार्थाचा बुंधाखालचा स्थळांत पडेल, तर तो पदार्थ नीट बसेल. हलक्या पदार्थांविषयीं ही गोष्ट सहज दाखवितां येईल; जे पदार्थ जमीनीत पुर- लेले असतात त्यांजवर अशी कल्पना चालणार नाहीं, ह्मणून त्यांचा गुरुत्वमध्याचें अनुमान, केवळ कृति आणि गणित यांणी केलें जाईल, त्या हिसाबांत पदा- र्याचें वजन, घट्टाई आणि त्याचा प्रकृतीची स्थितियां- ची गणना केली पाहिजे; आणि अशा रीतीनें पदार्था- चा गुरुत्वमध्याचे ठिकाण काढल्यावर तो पदार्थ स्थिर बसेल किंवा नाहीं याचा निर्णय करितां येईल.

 वांकडे बुरूज आणि वांकडे मनोरे पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणीं आहेत, त्यांस वरचासारिखे हिसाब लागू हो- तात. इतली देशांत पीसा नामें एक शहर आहे, त्यांत अशा तऱ्हेचा एक आश्चर्यकारक बुरूज आहे, त्याची उंची १८२ फुटी आहे, आणि तो लंबाबाहेर १६ फुटीं हून अधिक तोललेला आहे; याप्रमाणे तो शेंकडों वर्षे