पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गुरुत्वमध्य - वांकडे बुरूज.

६९

उभा आहे, आणि पुढेही शेंकडों वर्षेपर्यंत तसाच उभा राहील, असा तर्क करितां येतो. बोलोन्या शहरांतील दोन बुरूजही तोललेले आहेत, आणि १५८० वर्षांचा पूर्वीपासून ते तसेच आहेत असें लिहिलें आहे. दक्षिण वेल्स प्रांतांत लान्डाफयाजवळ कार्फिली किल्यांत आ- प्रेयी दिशेचा बुरूज पुरता ८० फुटी उंच नाहीं, तथापि तो ओळंब्याबाहेर ११ फुटी आहे. अशा जातीचे बुरूज डोरसेट प्रांतांत कोर्फ किल्यांत व ब्रिजनार्थ किल्यांत आहेत, आणि याखेरीज दुसऱ्या पुष्कळ ठि- काण आहेत.

 जेव्हां दिग्रेषा पायाचा बाहेर पडत्ये तेव्हां पदा- यांचा आंगीं पडण्याचा जो धर्म येतो तो या पुढ- ल्या उदाहरणावरून स्पष्ट दिसेल.

 एकादा पदार्थ, ( आकृति ३८ ) श्ववरंगाचा कांठावर ठेवून त्याचा गुरुत्वमध्यापासून ओळंबा सोडिला असतां, जर त्याची दिग्रेषा पायाचा आंत पडत आहे, तर तो पदार्थ नीट बसेल, कारण कीं त्याचा गुरुत्वमध्यास आधार मिळाला अस- तो; परंतु जर ती रेषा पायाचा भाकृति ३८. ग बाहेर पडेल, तर तो पदार्थ चवरंगावरून खालीं पडेल, कारण कीं या पक्षी त्याचा गुरुत्वमध्यास आधार मि- ळाला नसतो. त्या लांकडाचा तुकड्यास ३९ व्या