पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
गुरुत्वमध्य - माहितगारीचे दृष्टांत.

भाकृति ३९. आकृति ४०. अ क ड आकृतीप्रमाणे उलटून मांडिल्यानें हें उदाहरण दाखवितां येईल. जर त्या पदार्थाची दिग्रेषा बरोबर पा- याचा कांठावर पडत्ये, तर तो प- दार्थ अशा तन्हेनें बसेल कीं, जा कांठावर दिग्रेषा पडये, त्या बाजूस तो अगदीं थोड्या प्रेरणेनें लोटता येईल.

 पुढल्या ४० व्या आकृतींत अ लांकडाचा तुकड्याचा गु- रुत्वमध्य व आहे, तर ब क दि- ग्रेषा पायाचा आंत पडेल; या- मुळे वर सांगितलेल्या कारणा- वरून तो तुकडा नीट बसेल.परंतु त्या तुकड्यावर दुसरा तुकडा ठेविला अस- तां सर्व तुकड्याचा गुरुत्वमध्य इ होईल; ह्या बिंदूपा- सून ओळंबा सोडिला असतां दिग्रेषा पायाचा बाहेर पडेल असें दिसेल, ह्मणून तो सर्व तुकडा खालीं पडेल. याच कारणावरून होडी किंवा गलबत बुडायाचा सं- धीस येतें तेव्हां आंतील मनुष्यांचे एकदांच उभे रा हर्णे मोठें भयकारक होतें, कारण तीं मनुष्यें उभीं रा- हिलीं असतां, पूर्वीपेक्षां गुरुत्वमध्य कांहींसा वर होतो, तेणेंकरून तो कदाचित् दिग्रेषेचे बाहेर जाऊन असा प्रसंग येतो.

 गाड्यावर ओझें घालतांना वजनदार ओझें खालीं