पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गुरुत्वमध्य- यांत्रिक देखत भुली.

७५

अथवा वाटोळ्या कडीचा गुरुत्वमध्य, तारत असत नाहीं, परंतु त्या तारेचा मधल्या स्थळांत असतो.

 पदार्थाचा पाया जितका मोठा पसरट असेल, आ- णि त्याची दिग्रेषा जितकी मध्याजवळ पडेल, तितका तो पदार्थ दृढ बसेल असें वर सांगितलें. सर्व गोला- कार पदार्थांचा पाया एक बिंदू असतो, ह्मणून ते किं- चित हालले असतां त्यांची दिग्रेषा त्या पायाचे बाहेर जाये, ह्मणून वाटोळा गोळा सपाट जमीनीवर ठेविला असतां सहज गडबडतो. यावरून अ पदार्थाची दिग्रेषा पायाचा आंत पडत्ये ( आ- कृति ४४ ) ; ह्मणून तो उतरणीव- रून सरकत सरकत पडेल, परंतु व पदार्थाची दिग्रेषा पायाचा बा- हेर पडत्ये, ह्मणून तो त्या उतरणी- वरून गडबडत खालीं येऊन पडेल.
आकृति ४४.

 पदार्थाचा गुरुत्वमध्याचें मूळचें स्थान बदलून त्यास नवें स्थान देऊन पुष्कळ तऱ्हेचा यांत्रिक देखत भुली करितात; त्यांतील ही पुढील एक आहे; क वाटोळा दांडा अब उतरणीवर ठेविला असतां, त्याचा गुरुत्व- मध्य पृथ्वीकडे जातो, ह्मणून तो त्या उतरणीवरून खालीं येईल; ( आकृति ४५ ) प - रंतु त्या दांड्यांत एक शिशाचा खिळा एका बाजूवर स्थळीं मा- रिल्यावर तो खालीं येऊ लागला असतां, तो खिळा उचलला जातो, अ आकृति ४५. क