पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
गुरुत्वमध्य - यांत्रिक देखत भुली.

आकृति ४६. हे त्याचे वर चढणें गुरुत्वाविरुद्ध होतें, ह्मणून तो दांडा खालीं उतरणार नाहीं; जर तो खिळा ड स्थळीं असेल तर तो दांडा इ स्थळीं येऊन पडेल, आणि अशा री- तीनें तो आपल्या वजनाने वर चढेल. पुढील आनंद- कारक अनुभवांत हेच कारण दाखविलें आहे; दोन पट्ट्या घेऊन त्यांचा अ बाजूचीं टोंकें जोडून दुसऱ्या •ब बाजूची टोंकें पसरून ठेव आणि हीं पसरलेली टोंके किंचित उचल, नंतर ४६ व्या आकृ- तींत दाखविल्याप्रमाणें एक दुहेरी ब शंकूचा आकाराचा कांतलेला लांक- डाचा तुकडा, त्या उतरणीचा यापा- शीं ठेव, असें केल्यानें तो तुकडा त्या उतरणीवर अ पासून ब पर्यंत चढत जातो असें दिसेल, ही केवळ देखत भूल आहे. परंतु वास्तविक तसें होत नाहीं; कारण कीं जो त्या दुहेरी शंकुचा मध्य, तोच त्याचा गुरुत्वमध्य होय, आणि तो गुरुत्वामुळें वास्तविक खाली जातो.

 भोंवऱ्याचा गुरुत्वमध्य आरेवर येईल अशा रीतीनें त्यास आरेचा टोकावर उभे करणें केवळ अशक्य आहे, ह्मणून भोंवरा आरेचा अणीवर तरतरीत उभा करितां येत नाहीं; असें आहे तरी भोंवरा फिरविला असतां जोपर्यंत तो फिरत असतो तोपर्यंत तो उभा असतो, • कारण कीं त्याचा प्रत्येक फेऱ्यांत गुरुत्वमध्याचा स्था- नाचे पुष्कळ फेर होतात, आणि तेणेंकरून तो भोंवरा आपल्या भोवती सर्व बाजूंस पडूं लागतो; हे सर्व बा