पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गुरुत्वमध्य-यांत्रिक देखत भुलो.

७७

जूंवर पडण्याचे तोल, एकामागून एक त्वरित होत जातात, यामुळे एककाळींच झाल्याप्रमाणे ते एकमे- कास नाहींसे करितात.

 अंडाकृति पदार्थ सपाट जमीनीवर ठेवून हालवि- ला असतां तो कांहीं वेळपर्यंत आंदोलकाप्रमाणें झोंके खातो; कारण कीं मध्यापासून तो हालविला असतां त्याचा गुरुत्वमध्य एक बाजूवर चढतो, आणि तो ला- गलाच खालीं येऊ पाहतो; अर्धगोलाकार पदार्थाचा - ही असाच प्रकार होतो; अशा जातीचा पदार्थांची सपाट बाजू जेव्हां बरोबर वरतीं येत्ये तेव्हांच ते स्थिर होतात. लांकडाचा अर्धगोल करून त्यावर गिरादि- कांची मनुष्याकृति करून बसविलेली असें एक खेळणें असतें, त्यांत हेंच कारण स्पष्ट दिसून येतें; आणि पा- यांचाबद्दल त्या आकृतींत शिशाने भरलेला गुळगुळित अर्धगोल असतो, आणि तें शिसें इतकें खालीं असतें कीं ती आकृति नेहमी उभी राहत्ये; ह्मणून तीस धक्का दिला असतां ती लागलीच उठून उभी राहात्ये.-

 यावरून सामान्यतः पदार्थाचा दिग्रेषेचें स्थान जसें असेल आणि पदार्थ उलटण्याचा पूर्वी त्याचा गुरुत्वमध्य किती उंच चढवावा लागेल त्याप्रमाणे त्याची बैठक मज़बूद होईल. पदार्थ उलटू लागतो तेव्हां त्याचा गुरुत्वमध्याचा मार्ग वर्तुळांश होतो, आणि त्याचा पा- याचा शेवट त्या वर्तुळाचा मध्य होतो. जसें, अ ब चौरस लांकडाचा तुकडा आहे ( आकृति १७) त्याचा गुरुत्वमध्य ग आहे, तर ब बाजूस उलटत्येसमयीं जा