पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय ७.
मूळयंत्रे.

 मूळयंत्रे ह्मणजे साधीं यंत्रे आहेत ; त्यांचा सहाय्याने एकादें वजन उचलण्यास अथवा प्रति- बंध दूर करण्यास जी शक्ति लागेल, तिहून अधिक शक्ति यांचा सहाय्यावांचून तेच वजन उचलण्यास लागेल. -

 एकमेकास प्रतिबंधक अशा प्रेरणा जेव्हां पदार्थावर घडतात, तेव्हां तो पदार्थ स्थिर रहातो; अशा पक्षीं जा प्रेरणा परस्परांशी तुल्य होतात, त्यांचा संबं- धाचा मात्र विचार करावा लागतो; यंत्रशास्त्राचा या भागांत तुल्यप्रेरणांचा क्रियांचा विचार सांगितला आहे, ह्मणून तो भाग स्थिरताप्रकरणांतील आहे. आणि जेव्हां स्थिर पदार्थावर एक किंवा अधिक प्रेर- णा होऊन त्याचा आंगीं चलन उत्पन्न होतें, तेव्हां त्या पदार्थाची चलनदिशा, वेग, आणि चलनाची कालमर्यादा या तिहींचा विचार करावा लागतो, आणि जा भागांत या गोष्टींचे विवेचन केलें आहे तो भाग चलन प्रकरणांत येतो. -

 यंत्रे नवी शक्ति उत्पन्न करीत नाहींत, परंतु शक्तीस एका पदार्थांतून दुसऱ्या पदार्थात नेतात, अथवा तिचा कांहीं रूपभेद करितात; एकाद्या वजनावर अथवा प्र तिबंधावर शक्तीची योजना यंत्राचा योगानें सुलभ