पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
मूळयंत्रे—उच्चालक.

आहे, आणि त्यांतील पहिल्याचा आणि तिसऱ्याचा योगाने दुसरीं तीन झाली आहेत.

 १ आंसास खिळलेलें चाक, हैं उच्चालकापासून झाले आहे.
 २ पाचर अथवा खीळ, ही उतरर्णापासून झा लेली आहे.
 ३ मळसूत्र, हें उतरणीपासून झाले आहे.

या तिहींस गौण मूळयंत्रे ह्मणता येईल. -

 कोणत्या जातीचे कसेही बिकट यंत्र असो, तथापि या सहा मूळ यंत्रांपासून झालें आहे असें दाखवितां येईल.

_______
उच्चालक.

 सर्व यंत्रांत अतिशय साधें यंत्र उच्चालक आहे; लोखंडाची, लांकडाची, अथवा दुसऱ्या कांहीं पदा- थाची काठी अथवा दांडा उच्चालक आहे, आणि त्यास आधार देण्याकरितां एक बिंदूरूप टेंकू असतो, त्या- वर तो फिरतो.

 उच्चालकाचा विचार करण्याचा पूर्वी उच्चालक शक्ति, टेकू आणि उच्चालक पदार्थ, या तीन वस्तूंचा विचार प्रथम केला पाहिजे. उच्चालकशक्ति ह्मणजे, जी शक्ति उच्चाल्य पदार्थास उचलिये अथवा आधार देये ती; टेंकू ह्मणजे, धीर किंवा आधार आहे; आणि उच्चाल्य पदार्थ ह्मणजे, वजन इत्यादि जो उचलून धरण्याचा किंवा दूर