पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
उच्चालक

हे स्पष्ट आहे, की अ इ बाजू आणि अ शक्ति यांचा गुणाकार, इ ब बाजू आणि ब वजन यांचा गुणाकारा बरोबर होतो, तेव्हां तुलना होये; ह्मणून इ व बाजू जितकी लहान असेल, तितकें ब वजन मोठे असावें; ह्मणजे उच्चालकशक्ति आणि उच्चाल्यवजन हीं टेंकूपा- सून आपआपल्या अंतरांशीं उलठ्या प्रमाणांत असावीं. उदाहरण, टेकूपासून उच्चालक शक्तीची अइ लांबी १० इंच आहे असे मनांत आण, आणि टेंकूपासून उच्चाल्य वजनाचेंइ ब अंतर ५ इंच आहे, ब टोकाजवळचें वजन ४ तोळे आहे असें घे; तर अ टोंकावर लावण्याची उच्चा- लकशक्ति २ तोळ्यांची असावी, कारण कीं, टेंकूपासून उच्चाल्यवजनाचें अंतर ५ इंच आहे, आणि त्याचे वजन ४ तोळे आहे, तेव्हां यांचा गुणाकार वीस आहे, ( ५ x ४ = २० ) पुनः टेंकूपासून उच्चालकशक्तीचें अंतर १० इंच आहे, ह्मणून वरचाइतका गुणाकार येण्या- साठी त्यांस २ नीं गुणले पाहिजे, ह्मणजे ( १० x २ = २०) असे असल्याने मात्र तुलना होये.-

 उच्चालक तीन प्रकारचे आहेत; उच्चालकशक्ति, उच्चाल्यवजन आणि टेंकू यांचा स्थानभेदेकरून हे प्रकार होतात.

 पहिल्या प्रकारचा उच्चालकांत, उच्चालक शक्ति आणि उच्चाल्यवजन यांमध्ये टेंकू असतो.

 दुसऱ्या प्रकारचा उच्चालकांत, टेंकू आणि उच्चा- लकशक्ति यांमध्ये उच्चाल्यवजन असतें.