पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पहिल्या प्रकारचा उच्चालक.

९१

तिसऱ्या प्रकारचा उच्चालकांत, टेंकू आणि उच्चा- ल्यवजन यांमध्ये उच्चालकशक्ति असत्ये.-

 उच्चालकाचा मुख्य नियम या पुढीलप्रमाणें आहे; ह्मणजे, उच्चालकशक्ति आणि उच्चाल्यवजन हीं टैंकू- पासून आपआपल्या अंतरांशीं उलट्या प्रमाणांत असा- वीं, ह्मणजे एकाद्या उच्चाल्यवजनाशीं जी उच्चालक- शक्ति समान होत्ये, ती जर लहान असली तर टेंकू-पासून तिचें अंतर अधिक असावें.जेव्हां उच्चालक-शक्तीचा वेगाघात, उच्चाल्यवजनाचा वेगाघाताबरोबर असतो, तेव्हां तीं दोन्ही समतोल होतात.

_________
पहिल्या प्रकारचा उच्चालक.

 पहिल्या प्रकारचा उच्चालकांत, उच्चालकशक्ति आणि उच्चाल्यवजन यांमध्ये टेंकू असतो, त्याचा उप- योग मोठमोठी वजने उचलण्यांत, दगड सोडविण्यांत इत्यादि कामांत लागतो; जेव्हां त्यास अशा तऱ्हेने का मांत आणितात, तेव्हां त्यास तरफ ह्मणतात. पहिल्या प्रकारचा उच्चालक बाजूवरील (५९). व्या आकृतीत दाखविला आहे. जा टोकास उच्चालकशक्ति किंवा प्रे- रणा लागू करण्याची तें टोंक आ- कृतींत अ आहे, फ टेंकू अथवा भा- व आकृति ५९. क फ