पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/29

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डॉक्टर : मग ते काय व्यसन करून मर्द झालेत. त्यांनी रयतेची, दीनदुबळ्याची जबाबदारी घेतली. तुम्ही स्वत:ची तरी घेऊ शकता का? आपापला अभ्यास, स्वत:ची कामं, घरात मदत, व्यायाम शाळेतल्या कार्यक्रमात सहभाग यांतलं काय करता? अक्ष्या-संज्या: समजलं. मर्द बनणं म्हणजे जबाबदारी घेणं, आधी स्वत:ची मग इतरांची. डॉक्टर : करेक्ट. अक्ष्या : पण डॉक्टर बंड्याला काय झालं नेमकं? WN Dougs} डॉक्टर : अंमली पदार्थ काही काळासाठी नशा देतात पण प्रत्येक क्षणी तुमच्या शरीराची हानी करत असतात. मेंदूवरचा ताबा सुटतो, हृदय, यकृत, काळीज, नसा अशा महत्त्वाच्या अवयवांची वाट लागते. कावीळपासून कॅन्सरपर्यंत, पुरुषत्व जाण्यापासून ते वेड लागण्यापर्यंत, काहीही होतं. मग सांगा, मर्द बनायला अंमली पदार्थ घेऊन चालेल का? अक्ष्या : व्यसन करुन जर डोकच आऊट होत असेल तर विचार कसा करणार? विचारच नाही करायला जमला तर अभ्यास, कामं, जबाबदारी सगळे गेलं बोंबलत डॉक्टर : बरोबर म्हणूनच खरा मर्द अंमली पदार्थाला 'नाही' म्हणतो. १८अफलदार्थ | |