पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वें. ] सतराव्या शतकांतील इंग्लंड. ११९ करून घेई; परंतु जेम्स हा अगदींच अकर्तृत्वान् होता, इतकेंच नव्हे तर आपल्या स्वतःच्या अधिकारासंबंधानें त्याच्या कल्पना फारच चमत्कारिक असल्यानें, त्याच्या अमदानींत पार्लमेंटशी झगडण्याचे बरेच प्रसंग येऊन राजा व पार्लमेंट यांमधील अधिकारविभागणीसंबंधाच्या कलहाचें बीज पेरलें जाऊन, १६८८ मध्ये झालेल्या राज्यक्रांतीनें स्टुअर्ट घराण्याचें उच्चा- टण होईपर्यंत या प्रश्नाचा समाधानकारक व कायमचा असा निकाल लागला नाहीं ! जेम्स गादीवर आला त्यावेळीं इंग्लंडची सांपत्तिक स्थिति फारच खालावली होती, तेव्हां नवीन कर बसवून ही स्थिति सुधारणे अत्यावश्यक होतें. जेम्सच्या जागीं इलिझाबेदप्रमाणें कर्तृत्ववान् व दूरदर्शी राज्यकर्त्री असती, तर तिनें पार्लमेंटच्या संमतीनेंच आपणास पाहिजे तसे कर बसवून इंग्लंडची सांपत्तिक स्थिति सुधारून घेतली असती ! परंतु असा दूरदर्शीपणाचा विचार करण्याची जेम्सला अवश्यकताच वाटली नाहीं. त्यानें पार्लमेंटची मुळींच संमति न घेतां आपल्या स्वतःच्याच अधिकारानें · लोकांवर नवीन कर लादले. आपण बसविलेल्या करांस पार्लमेंटसभेकडून आज नाहीं उद्यां खात्रीनें संमति मिळेल अशी त्याची कल्पना होती; परंतु लवकरच ही त्याची कल्पना पार चुकीची ठरली. आपण लादलेल्या करांस पार्लमेंटसभा संमति देत नाहीं असें आढळून आल्यावर त्यानें ती पार्ल- राजा व पार्लमेंट यांच्यामधील खटका. मेंट सभा रद्द ठरवून दुसरी भरविली. परंतु जेम्सनें अशा प्रकारें लोकांचा व पार्लमेंट सभेतील सभासदांचा रोष संपादन करून घेतल्यामुळे, त्या सभेसही स्वतःच्या हक्काची जाणीव उत्पन्न होऊन तिनें राजास आपल्या संमतीशिवाय कोणत्याही प्रकारचा कर बसवि - ण्याचा अधिकार नाहीं असें जाहीर केलें. अशा प्रकारें जेम्सनें आपल्या राष्ट्रांतील सर्वच लोकांची अप्रियता संपादन केली होती व यानंतर त्याच्या परराष्ट्रीय धोरणामुळे त्याच्या