पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वें. ] सतराव्या शतकांतील इंग्लंड. १३७ होतें ! गेल्या दहा वर्षांत प्युरटिन पंथीय लोकांनी इंग्लंडच्या एपिस्को- पेलियन धर्मामध्यें ढवळाढवळ करून प्युरीटन व प्रेसबिटेरियन पंथ इंग्लंडवर लादण्याचा प्रयत्न चालविला होता, तो पार मोडून टाकून पुनः पूर्ववत् एपिस्कोपेलियन धर्मपंथच पूर्णपणे प्रस्थापित करण्याचें धोरण या पार्लमेंटनें कायम करून ते सहजरीतीनें साध्य करून घेण्यासाठीं इतर धर्मपंथां- विरुद्ध कडक कायदे पास केले. १६६१ मध्ये या पार्लमेंटनें धार्मिक बाबतींत निर्बंध घालण्यासाठी पहिला कायदा पास केला. या कायद्यान्वये कोणत्याही शहरच्या म्युनिसि- पालिटीमधील नोकरास आपण राजसत्तेविरुद्ध शस्त्र उचलणार नाहीं; व 'एपिस्कोपेलियन धर्मपंथास संमत असलेलेच आचार पाळूं' अशा प्रकारची शपथ घ्यावयाची असल्यामुळे रोमन कॅथलीक ' किंवा प्युरीटन पंथीय अनुयायांस म्युनिसिपालिटींतील नोकरी पतकरणें म्हणजे आपला धर्म- धार्मिक बाबती- तील निर्बंध. पंथच सोडण्यासारखें होई ! यानंतर पुढच्याच वर्षी इंग्लंडमधील सर्व धर्माधिकाऱ्यांनी इंग्लिश चर्चनें मान्य केलेलेंच प्रार्थनेचें पुस्तक आपापल्या चर्च- मधून चालविलें पाहिजे असा निर्बंध घालण्यांत आला ! या निर्बंधामुळे कितीतरी रोमन कॅथलीक व प्युरीटन धर्माधिकाऱ्यांस आपापल्या जागेचा राजीनामा द्यावा लागला ! Test-acts अशा प्रकारें पार्लमेंटकडून धार्मिक बाबीसंबंधानें कडक कायदे पास होऊन इतर धर्मपंथांचे इंग्लंडमधून उच्चाटण करण्याचे प्रयत्न चालले होते; तरी पार्लमेंटच्या या कृतीस २ ऱ्या चार्लस राजाची मुळींच अनुकूलता नव्हती ! इंग्लंडमध्यें आल्यावर थोड्याच दिवसांनी एपिस्कोपेलियन धर्मपंथावरील त्याचा विश्वास उडून जाऊन त्यानें गुप्तपणे रोमन कॅथलीक पंथाचा अंगीकार केला होता. राजाच्या धार्मिक विचारा- २ या चार्लसचें परराष्ट्रीय धोरण. मध्ये अशाप्रकारें क्रान्ति झाल्यानें त्याचें परराष्ट्रीय धोरणही अर्थातच बदललें ! फ्रान्सचा राजा १४ वा लुई हा रोमन कॅथलीक पंथाचा कट्टा अनुयायी असल्यामुळें त्याचें चार्लसवर वजन बसून, . केवळ त्याच्याच