पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० वें. ] १४ व्या लुईच्या अमदानीतील फ्रान्सचा उत्कर्ष, १५३ पृवीं चार्लसनें आपल्या मृत्युपत्रांत आपल्या सर्व साम्राज्याचें, लुईचा नातू फिलीप यासच वारस केलें होतं. चार्लसने अशाप्रकारें आपलें मृत्यु- पत्र केलेलें पहातांच लुईनें आस्ट्रियाशीं थोड्याच दिवसांपूर्वी केलेली तडजोड धाब्यावर बसवून, आपला नातू फिलीप हा एकटाच स्पेनच्या साम्राज्याचा वारस आहे असें जाहीर करून त्यास स्पेनचें राज्यपद घेण्या- साठीं स्पेनची राजधानी मॅड्रीड येथे पाठविलें. लुईनें सर्व करारनामे मोडून सर्वांस एकदम चकविल्यामुळें १७०१ मध्यें बादशहा, जर्मन संस्थानें, हॉलंडचे राष्ट्र व इंग्लंड यांनी त्याच्या विरुद्ध एक बलाढ्य संघ स्थापन करून युद्ध पुकारलें. यावेळीं दोन्ही पक्षांच्या बलाबलाचा विचार केल्यास लुईच्या बाजूलाच पारडें अधिक झुकेलसें दिसत होतें. लुईचें सैन्य व आरमार उत्कृष्टप्रतीचें होतें व आतां तर स्पेनचें सर्व आरमार व लष्कर लुईस आपल्या- च उपयोगांत आणतां येणें शक्य असल्यामुळे लुईची बाजू अधिक बलाढ्य दिसत होती. इकडे संयुक्त राष्ट्रांमधील जूट शेवटपर्यंत कायम राहते कीं नाहीं याची शंकाच होती ! परंतु सैन्यबळ व युद्धसामुग्री यांचा पुरवठा संयुक्त राष्ट्रांकडे अधिक असून इंग्लंडचा सेनापति मार्ल- बरो, सेव्हाय संस्थानाचा राजपुत्र युजेन ह्या दोन प्रख्यात सेनापतींच्या हाताखालीं संयुक्त सैन्य लढत असल्यामुळें, फ्रान्स- च्या नांवाजलेल्या फौजेशीं संयुक्त राष्ट्रांचें सैन्य धैर्यानें तोंड देईलसें वाटू लागलें. अशाप्रकारें १४ वा लुई व इतर युरोपियन राष्ट्रं यांच्यामध्यें उपस्थित झालेल्या युद्धाचा वणवा सर्वत्र पसरून फ्रान्स व स्पेन यांच्या ज्या ज्या ठिकाणीं वसाहती होत्या त्या त्या ठिकाणी देखील याच्या ज्वाळा जाऊन पोहोंचल्या. स्पेनच्या गादी- वरील वारस हक्कासंबंधी युद्ध - १७०२-१७१३. १७०४ मध्यें डॅन्यूब नदीजवळ ब्लेनहिम या गांवानजीक मार्ल- बरो याच्या हाताखालील सैन्यास मोठा जय मिळाला. यानंतर युजेन याची कुमक आल्यावर तर फ्रेंच सैन्याचा एकसारखा पराभव होऊं लागला. १०