पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ वें, ] रशियाचा अरुणोदय. १६५. ती सर्व निष्फळ ठरली. चार्लसच्या मृत्यूनंतर (१७१८) स्वीडनच्या गादीवर येणारी त्याची बहीण उलरिका एलेनार हिच्या स्वीडनचा इतर राष्ट्रांशीं तह - १७२१. अमदानीत स्वीडिश अमीर उमरावांकडून तिच्या हातांतील बरेच अधिकार कमी करण्यांत आले. अशा प्रकारें स्वीडनचें पूर्ववैभव नष्ट झाल्यावर स्वीडनला इतर राष्ट्रांशी निस्टॅड येथें तह केल्यावांचून गत्यंतरच नव्हतें ! या तहानें (१) डेन्मार्कच्या राजास त्याचा पूर्वीचा सर्व प्रदेश परत मिळाला. (२) हॅनोव्हर व ब्रॅनडेनबर्ग या दोन जर्मन संस्थानांना स्वीडनकडून गिळंकृत करण्यांत आलेला प्रदेश परत मिळाला. (३) आगस्टस यास पूर्ववत् पोलं-- डचें राज्यपद देण्यांत आलें. (४) रशियाचा बादशहा पीटर याच्याच प्रय- त्नानें स्वीडनचा पराभव झाल्यामुळे रशियास कॅरेलिया इंग्रिया, एस्थोनिया लिव्होनिया — थोडक्यांत फिनलंडशिवाय स्वीडनच्या ताब्यांत असलेला बाल्टिक समुद्रालगतचा सर्व प्रदेश मिळाला. अशाप्रकारें पीटरच्या प्रयत्नानें रशियाची एकदम उन्नति होऊन श्रेष्ठप्रतीच्या राष्ट्रांमध्यें रशियाची गणना होऊं लागली, पाश्चात्य सुधारणा व पाश्चात्य आचारविचार यांचा रशियन लोकांवर पगडा बसून राशियाचा उत्कर्ष होऊं लागला तरी जुन्या समजुतीच्या लोकांना पीटरचें करणें मुळींच आवडलें नाहीं. इतकेंच नव्हे तर आपल्या जुन्या समजुती व आचारविचार सोडून पाश्चात्य आचारविचारांचा स्वीकार करणें म्हणजे आपला स्वामिमानच सोडण्यासारखें आहे अशी त्यांची समजूत होती. परंतु या लोकांस पीटरचें मन वळवितां न आल्यामुळें पीटरनंतर गादीवर येणारा राजपुत्र अलेक्सिस याच्यावर कायती पुराणाभिमानी लोकांची भिस्त होती ! राजपुत्र अलेक्सिस यानेंही आपण जुन्या चालीरीतींचे अभिमानी आहों असें बोलून दाखविलें होतें ! आपल्या मुलाचीं अशा- प्रकारचीं मतें पाहून पीटरला फारच वाईट वाटे, आपल्यानंतर अलेक्सिस-- कडून आपण प्रस्थापित केलेल्या सर्व सुधारणांचा विध्वंस करण्यांत येईल ही