पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रशियाचा उदय व उत्कर्ष.. १७७ १२ वें. ] सयलेशिया प्रांत पूर्णपणे फ्रेडरीकच्या ताब्यांत दिला तेव्हां आतां इतर राष्ट्रांशी तोंड देण्याचे काम बरेंच सुलभ झालें. या सुमारास इंग्लंड व हॉलंड ही दोन राष्ट्रें आस्ट्रियाच्या वतीने युद्धांत पडल्यामुळे तर युद्धाचें क्षेत्र अधिकच विस्तृत झालें ! मेरिया थेरिसा हिनें बव्हेरिया प्रांत जिंकून घेऊन दक्षिण जर्मनीवर आपलें वर्चस्व गाजविलें व आतां सर्व जर्मनीवर तिचें वर्चस्व प्रस्थापित होतें कीं काय असें वाटूं लागलें. तेव्हां आतां फ्रान्सला मदत करण्यासाठीं जर आपण युद्धांत भाग घेतला नाहीं तर आज नहीं उद्यां संयलेशिया प्रांतावरील आपले वर्चस्व नष्ट होईल या भीतीनें प्रशिया- च्या फेडरीकनें लागलींच १७४५ मध्यें मेरिया थेरिसेच्या सैन्याचा पराभव करून तिला ड्रेसडेन या ठिकाणीं तह करणें भाग पाडलें. हा तह झाला तरी मोरिया थेरिसेचें उरलेल्या शत्रूंशीं युद्ध सुरूच होतें. सरतेशेवटीं आठ वर्षे युद्ध करून दोन्ही पक्ष जेरीस आल्यामुळे १७४८ मध्यें एक्स-ला-शापेल या ठिकाणीं तह होऊन युद्ध थांबविण्यांत आलें. हा तह होण्यापूर्वी १७४५ मध्ये तिचा पति लॉरेनचा संस्थानिक फॅन्सीस याची रोमन पादशाहीपदावर नेमणूक झाल्यामुळें बादशाहीपद पुनरपि हॅप्सवर्ग घराण्यांतच राहिलें. एक्स-ला-शापेल या तहानें सॅयलेशिया प्रांताखेरीज आस्ट्रियाच्या ताब्यांत असलेल्या सर्व प्रदेशावर मेरिया थेरे- साचेंच वर्चस्व असल्याचें सर्वांनीं कबूल केलें. या युद्धामध्यें आस्ट्रियासारख्या बलाढ्य पराभव करून सॅयले- शिया प्रांत मिळविल्यामुळें तर फ्रेडरीकचा दरारा सर्वत्र बसला व फ्रान्स, इंग्लंड, आस्ट्रिया वगैरे प्रमुख राष्ट्रांमध्यें प्रशियाची गणना होऊं लागली ! यानंतर पुढील दहा वर्षे फेडरीकनें अंतस्थ बाबींमध्यें महत्त्वाच्या सुधारणा करण्याकडे घालविलीं. त्याने ठिकठिकाणी कालवे खणून दळणवळणाचे मार्ग सुलभ करून ठेवले. त्याचप्रमाणें लोखंड, लोकर, मीठ वगैरे वस्तूंची पैदास करणाऱ्या कार- खान्यास त्यानें उत्तेजन दिलें. अशाप्रकारें औद्यो- ...गिक बाबींमध्यें महत्त्वाच्या सुधारणा केल्यावर, वाङ्मय व कलाकौशल्याच्या फ्रेडरीक अंतःस्थ बाबींत लक्ष घालतो.