पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ वॅ. ] फ्रान्समधील राज्यक्रान्ति. २०१ ( १७७४-७६ ) व सांपत्तिक उलाढालीची नीट माहिती असलेला फड- णीस नेकर ( १७७८ ते ८१; १७८८ ते ९० ) हीं दोन प्रमुख माणसें होतीं. या अर्थशास्त्रज्ञांनी आपणाकडून प्रयत्न केला तरी अमीरउम- रावांच्या दुराग्रहामुळे त्यांना कोणत्याच बाबतींत सुधारणा करितां येईना; व या वेळीं फ्रेंच राष्ट्रानें इंग्लंडवर सूड घेण्यासाठीं अमेरिकेला स्वातंत्र्य- प्राप्तीसाठी केलेल्या युद्धांत (१७७५-८३ ) बरीच सांपत्तिक मंदत केल्यामुळें फ्रान्सचें कर्ज मात्र बेसुमार वाढलें; तें इतकें कीं १७८५ च्या सुमारास फ्रेंच राष्ट्राचें दिवाळें वाजणार असें स्पष्ट दिसूं लागलें ! तेव्हां आतां दुसरा कांहीं उपाय नाहीं हें पाहून सर्व राष्ट्राचें, या राष्ट्रीय आपत्ती- बद्दल विचार घ्यावा या उद्देशानें १६ व्या लुईनें १७८९ च्या मे महिन्यांत पॅरिस शहरीं फ्रान्सचें पार्लमेंट- राष्ट्रीय मंडळ - दीडशे वर्षांनंतर पुनः बोलविण्याचें ठरविलें. फ्रान्सचें हें 'राष्ट्रीय मंडळ' पूर्वी सरंजामी पद्धत अस्तित्वांत आली त्या वेळेपासून राजास राजकीय बाबतींत सल्ला देण्यासाठी भरविण्याचा प्रघात असे. इंग्लिंश पार्लमेंटमध्यें ज्याप्रमाणें अमीरउमराव व मध्यम स्थितींतील लोक यांच्या निरनिराळ्या सभा आहेत, त्याप्रमाणें फ्रान्सच्या राष्ट्रीय मंडळांत अमीरउमराव, धर्माधिकारी व मध्यम स्थितींतील लोक यांच्या तीन निरनिराळ्या सभा असून प्रत्येक सभा आपलें मत वेग- वेगळें व्यक्त करीत असे. परंतु गेल्या दीडशे वर्षांत अशाप्रकारची सभा पूर्वीच्या राजांनी बोलाविली नसून, आपल्या स्वतःच्याच अनियंत्रित सत्तेनें ते राज्यकारभार करीत असल्यामुळे, दीडशे वर्षांनंतर पुनरपि बोलविण्यांत आलेल्या सभेचें काम कसें चालवावयाचें, पूर्वीचा प्रघात काय आहे, याची देखील पुष्कळांस विस्मृति पडली असल्यास त्यांत कांहींच नवल नव्हतें ! तेव्हां, हें 'राष्ट्रीय मंडळ' बोलाविण्यांत आल्यावर पहिला मोठा : प्रश्न विचारासाठीं निघाला, तो हा कीं अमीरउदराव व धर्माधिकारी यांना 93