पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण या वेळीं फ्रेंच राष्ट्रानें या खुनी सत्ताधारी मंडळास आपले स्वातंत्र्यच विकून या सुलतानी अनियंत्रित व जुलमी अशा सत्तेच्या अंमलाखालीं गुलामगिरीपेक्षांही अधिक गुलामगिरीच निमूटपणें पतकरली असेंच म्हणावयास पाहिजे ! जुलमी व सुलतानी राज्यव्यवस्था. ( ता. २ जून १७९३ ते २७ जुलै १७९४ ) ता. २ जून १७९३ रोजी फ्रान्समधील राष्ट्रीय मंडळ माऊंटेन पक्षाच्या ताब्यांत गेल्यावर ' सार्वजनिक सुरक्षितता स्थापण्यासाठी एक १२ सभासदांची नवी कमिटी नेमण्यांत येऊन या कमिटीकडे राष्ट्रांतील सर्व अंमलबजावणीचे अधिकार देण्यांत आले. या कमिटीत आपल्या कर्तबगारीनें नव्हे तर इतर वाममार्गांनीं मॅरा व रोबेसपिअर हीं माणसें पुढें येऊन, या कमिटीनें सार्वजनिक सुरक्षिततेच्या नांवाखालीं जीं अनन्वित कृत्यें केलीं, त्या सर्व कृत्यांशीं या गृहस्थांचीं नांवें प्रामुख्यानें संलग्न असत. राष्ट्रांत सुरक्षितता राखण्याचें जबाबदारीचें काम या कमिटीकडे सोंपविण्यांत आल्यामुळे, आपलें काम चोख व्हावें म्हणून या कमिटीनें खालील उपाय योजले. पहिल्याप्रथम केवळ संशयावरून अटकेंत ठेव- ण्याचा कायदा करण्यांत आला. या कायद्याच्या प्रभावानें या कमिटीस वाटेल त्या माणसास नुसत्या संशयावरून अटकेंत ठेवतां येणें शक्य झालें ! सार्वजनिक सुरक्षित- तेच्या कमिटीची काम करण्याची चोख पद्धत । राज्यक्रान्तीविरुद्ध ज्या माणसांचा कल आहे असा या मंडळास संशय येई त्या सर्व माणसांस तात्काळ तुरुंगांत खेचण्यांत येई. अशारीतीनें थोडक्याच वेळांत सर्व तुरुंग कैद्यांनीं भरून जात ! व मग ते रिकामे करण्याची मोठी जबाबदारी या मंडळावर पडल्यामुळें, पकड- लेल्या लोकांची झटपट चौकशी करण्यासाठीं एक न्यायासन ( ! ) मुद्दाम स्थापन करण्यांत आलें. पहिल्या पहिल्यानें नीट चौकशी करून मग