पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ वें. ] फ्रान्सचें लोकसत्ताक राज्य व नेपोलियन. २३७ ज्याची नसली तरी सुराज्याची अवश्यकता असल्यामुळे नेपोलियनच्या या व्यवस्थेनें त्यांना स्वस्थता मिळाली असें म्हणण्यास हरकत नाहीं ! यानंतर नेपोलियननें फ्रान्सला कॅथलीक चर्चेच्या अंमलाखालीं पुनरपि आणण्याचा निश्चय केला. गेल्या राज्यक्रांतीमुळें फ्रान्समधील कॅथलीक चर्चची सत्ता संपुष्टांत आली होती. चर्चची सर्व मालमत्ता जप्त करून 'धर्माधिकाऱ्यांस सरकारनें चर्चच्या व्यवस्थेसाठी ठेवण्यांत आलेले अंमलदार बनविलें होतें. फ्रान्समध्यें पुन: रोमन कॅथलीक पंथाची स्थापना केल्यास आपणास फ्रान्समधील बहुजनसमाजाचें पाठबळ मिळेल असें वाटून नेपोलियननें पोपशीं यासंबंधानें बोलणें लावून चर्चसंबंधी सर्व व्यवस्था कायम केली. राज्यक्रान्तीच्या अमदानीत सरकारजप्त झालेली सर्व मालमत्ता सरकारच्या पूर्णपणे ताब्यांत आली व याबद्दल सरकार- कडून चर्चच्या व्यवस्थेसंबंधीं सर्व खर्च सोसण्यांत यावा असें ठरलें. याखेरीज धर्माधिकारी नेमण्याचा अधिकार मात्र नेपोलियनने आपल्या हाती ठेवला. अशाप्रकारें सर्वस्वी सरकारवर अवलंबून असलेली, परंतु नांवाला मात्र पोपशी संबंध असलेली चर्चव्यवस्था पुनरपि फ्रान्समध्यें स्थापन झाली ! कोड नेपोलियन. परंतु वरील सर्व सुधारणांपेक्षां ज्यायोगें नेपोलियनचें नांव अजरामर राहील अशा महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे त्यानें 'न्यायखात्यांत केलेली 'सुधारणा' व ' कोड नेपोलियन' या नांवाचे सर्व कायदे एके ठिकाणी व्यवस्थितरीतीनें संगृहीत केलेला ग्रंथ याच होत ! सर्व खात्यांपेक्षां न्याय- खात्यांत तर विलक्षण गोंधळ माजलेला होता; परंतु १८०४ मध्यें नेपोलियनने देशांतील सर्व ठिकाणचे, व असंबद्ध असलेले कायदे एके ठिकाणीं सुव्यवस्थित रीतीनें 'कोड नेपोलियन' या ग्रंथांत संगृहीत करून न्यायखात्यांतील गोंधळ नाहींसा केला. रोमन पातशहा जस्टीनियन ( ५२७-५६५ ) याच्या वेळेपासून अशाप्रकारें देशांतील सर्व कायदे एकत्र ग्रथित करण्याचा प्रयत्न कोणींच केलेला नव्हता !