पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४२ टिलसीटचा तह १८०७. प्रशियाचे वर्चस्व कमी होतें. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरणा मिळून प्रशियास मात्र आपल्या अर्ध्या मुलखास मुकावें लागलें. नेपोलियननें एल्ब व हाईन या दोन नद्यांमधील नवीन मिळालेल्या मुलखाचें 'बेस्टफॅलीयाचें राज्य' असें एक नवीन- च राज्य निर्माण करून आपल्या 'जेरोमे' या भावास त्याचा राजा केलें ; व त्याचप्रमाणें प्रशियाच्या ताब्यांतील पोलंडच्या मिळालेल्या मुलुखाचें वासीचें एक संस्थान बनवून तें सॅक्सनीच्या संस्थानिकाच्या ताब्यांत देऊन त्यास 'राजा' ही पदवी दिली. अशा रीतीनें प्रशियाचे जर्मनीमधील वर्चस्व नाहींसें झाल्यानें तें राष्ट्र एखाद्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रतीच्या राष्ट्राच्या स्थितीप्रत आलें ! टिलसीटच्या तहानें घडून आलेली मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेपोनियन व अलेक्झांडर यांच्यामधील स्नेहसंबंध ही होय ! नेपोलियननें पश्चिम युरोपवर आपलें वर्चस्व प्रस्थापित करावें व अलेक्झांडरनें पूर्व युरोपकडे आपलें लक्ष पुरवावें असें या दोन बादशहांमध्ये झालेल्या तहांत ठरून सर्व युरोपखंडावर यांच पूर्ण वर्चस्व प्रस्थापित होणार असें वाटूं लागलें. अशाप्रकारें टिलसीटच्या तहाच्या वेळीं नेपोलियन वैभवाच्या अत्युच्च शिखराप्रत पोहोंचला असून त्यानें सर्व युरोपवर आपले वर्चस्व स्थापलें होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं ! तो आतां फ्रान्सचा बादशहा असून इटलीचें राज्यपद त्यानें स्वतःकडेच घेतलेलें होतें; व नेपोलियनचें वर्चस्व, याशिवाय व्हाइन नदीच्या आसपास असलेल्या जर्मन संस्थानांच्या संघाचें नेतृत्व त्याच्याकडेच असून स्वीझर्लंडचें हेलवेटिक लोकसत्ताक राज्य त्याच्याच हुकमतीखालीं होतें ! याखेरीज हॉलंड, वेस्टफॅलिया, नेपल्स वगैरे राज्यांवर त्यानें आपल्या नातलगांस बसविलें असल्यामुळे तीं राज्यही