पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ . ] राज्यकर्त्यांच्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध चळवळी. २६९ युरोपमध्ये १८३० च्या सुमारास झालेल्या चळवळी पोलंडमध्यें याच सुमारास झालेल्या दंग्याच्या मानानें अगदींच क्षुल्लक होत ! व्हिए- स्नाच्या परिषदेनें आस्ट्रिया व प्रशिया यांकडून मिळालेला पोलंडचा प्रदेश रशियाच्या हवाली केला होता है आपण पाहिलेच आहे. रशियाचा झार अलेक्झांडर यानें पोलंडचें एक वेगळें राज्य स्थापन करून तेथील लोकांस बरेच हक्कही दिले होते ! परंतु मानी पोलिश लोकांस एवढ्यानें -समाधान होईना ! रशियाचा बादशहा अलेक्झांडर जिवंत होता तोंपर्यंत पोलंड- मध्यें कांहीं विशेष असंतोष माजला नाहीं; परंतु १८२५ सालीं अलेक्झांडर मृत्यु पावून त्याचा भाऊ गादीवर आला, तेव्हां त्याच्या उद्दाम वर्तनानें सर्वत्र असंतोष माजूंं लागला. १८३० सालीं सर्व युरोपियन राष्ट्रांतून चळवळी झालेल्या पाहून पोलिश लोकांनाही, रशियाच्या मगरमिठींतून सुटण्याची हीच योग्य संधि आहे, असें वाटूं लागलें ! १८३० च्या नोव्हेंबर महिन्यांत कांहीं तरुण पुढाऱ्यांच्या चिथावणीवरून पोलिश पोलंडमधील दूंगा लोकांनी बंड उभारलें, व त्यांनीं पोलंडचें सर्व १८३०. राज्य आपल्या ताब्यांत घेतलें. आपल्या अंकित असलेल्या पोलिश लोकांनी बंड केलेले पाहून क्रूर निकोलस अर्थातच चवताळला व त्यानें तेथील बंडाचा मोड करण्या- साठीं आपलें सैन्य रवाना केलें. कवाईत शिकवून तयार असलेल्या अवाढव्य रशियन सैन्यापुढें पोल्स लोकांचें कांहींच चालेना ! रशियन सैन्याच्या मदतीनें पोलंडमधील दंगा मोडल्यावर आतां पुनरपि असा दंगा करण्याची संधिच पोल्स लोकांना मिळू न देण्याचें झार निकोलसने ठरविलें. पोलंडचें विभक्त असें लहानसें राज्यच मोडून टाकण्यांत येऊन, अवाढव्य रशियन साम्राज्याचा पोलंड हा एक प्रांतच करून टाकण्यांत आला ! पोलंडमध्यें पोलिश भाषेऐवजी रशियन भाषा वापरावी, त्यांचा रोमन कॅथलीक धर्म मोडून टाकून, सर्वांनीं ग्रीक चर्चचे अनुयायी व्हावें