पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नेपोलियन अमेरिकन राज्यकारणांत हात घालतो - १८६३. संयुक्त जर्मनी. ३०३ १९ वें. ] याखेरीज खुद्द रोम शहरीं पोपच्या संरक्षणासाठी म्हणून फ्रेंच सैन्य जय्यत असल्यामुळे तर इटालियन लोकांना त्याच्याबद्दल तिटकाराच वाटूं लागला होता ! अशा वेळीं अमेरिकन राज्यकारणांत नसता हात घालण्याची त्यास बुद्धि झाली ! अमेरिकेतील मेक्सिको संस्था- नांतील अंतस्थ राज्यकारणांत हात घालून त्यानें तें दुर्बल लोकसत्ताक राज्य मोडून टाकलें; व १८६३ सालीं आस्ट्रियाच्या बादशहाचा भाऊ मॅक्झिमीलन यास तेथील राज्यपद देऊन, मेक्सिकोमध्यें राजसत्ता स्थापन करण्याचा नेपोलियननें प्रयत्न केला ! नेपोलियनच्या या कृत्याचा सर्व अमेरिकन लोकांस तिटकारा वाटून अमेरिकेत त्यावेळीं चाललेली आपापसांतील लढाई संपतांच 'युनायटेड स्टेटस्' नें नेपोलियनला अमेरि- कन राज्यकारणांत ढवळाढवळ न करण्याची ताकीद दिली. तेव्हां आतां दुसरा कांहीं इलाज नाहीं हें पाहून नेपोलियननें आपलें फ्रेंच सैन्य अमे- रिकेतून परत बोलाविलें. फ्रेंच सैन्य मेक्सिकोंतून जातांक्षणीं बिचाऱ्या मेक्झिमीलन राजास मात्र अमेरिकन लोकांनीं पकडून फांशीं देऊन ( १८६७ ) मेक्सिकोमध्यें पुनः लोकसत्ताक राज्य स्थापन केलें ! इकडे १८६६ च्या सुमारास फ्रेंच सैन्य अमेरिकेत असल्यामुळे प्रशिया व आस्ट्रिया यांच्यामधील युद्धाच्या वेळीं नेपोलियनला तटस्थ रहावें लागून प्रशियाला आस्ट्रियाविरुद्ध मोठा जय संपादन करितां आला ! नेपोलियन चें असें म्हणणें होतें कीं, प्रिन्स बिस्मार्कनें आपणास या युद्धाच्या वेळीं तटस्थ राहण्याबद्दल विनंति केल्या- मुळेच आपण तटस्थ राहिलों होतों, तेव्हां आपल्या या कामगिरीबद्दल प्रशियानें लक्झेम्बर्ग हा प्रांत पूर्वी कबूल केल्याप्रमाणें देणें इष्ट होय ! नेपोलियननें त्या प्रांताबद्दल बिस्मार्कशी बोलणें करितांच, 'आपण अशा प्रकारचें कधींच वचन दिलें नव्हतें' असें प्रिन्स बिस्मार्ककडून सांगण्यांत येऊन नेपोलियनच्या या मागणीचा सर्व फ्रान्स व प्रशिया या राष्ट्रांमध्यें वितुष्ट येतें.