पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण च्या अंकित आहे. इंग्लंडने गेल्या चार शतकांमध्यें हिंदुस्थानावर वर्चस्व प्रस्थापित करून पांचही खंडांतील आपल्या वसाहती कशा प्रस्थापित केल्या याबद्दलची हकीकत पुढील प्रकरणी सांगण्याचें योजलें आहे.. जगाच्या एक पंचमांश भागावर, पांचही खंडांत पसरलेल्या साम्राज्यामुळे इंग्लंडवरील जबाबदारीही तशीच वाढली आहे. आपल्या अवाढव्य, विस्तृत साम्राज्याचें परकीय शत्रूंपासून संरक्षण करणें अत्यावश्यक असल्यामुळें गेल्या शतकांतील इंग्लंडचा आरमारी खर्च बेसुमार वाढला ! एकोणिसाव्या शतकामध्ये इंग्लंडच्या आशियाखंडांतील मुलखास राशयाकडून धोका येण्याचा बराच संभव होता. या बलाढ्य शत्रूपासून भूमध्यसमुद्रांतून आपल्या पूर्वेकडील मुलखाकडे जाणाऱ्या मार्गास धोका पोंहचं नये म्हणून इंग्लंडला क्रिमियन युद्धांत भाग घेऊन ( १८५४- ५६ ) रशियाशी झुंज करून टर्कीचें नादान मोहरें जिवंत ठेवावें लागलें.. रशियाचा कॉन्स्टॅटिनोपलकडे आज कितीतरी दिवसांचा डोळा असून भूमध्य समुद्रावर हुकमत चालविणारें कॉन्स्टॅटिनोपल शहर हस्तगत करण्यासाठींच रशियानें टर्कीवर हल्ला केला होता, परंतु त्यावेळीं इंग्लंड डोळ्यांत तेल घालून रशियाच्या हालचालीकडे. पहात असल्यामुळे रशियाचा त्यावेळचा प्रयत्न सिद्धीस गेला नाहीं. कॉन्स्टॅटिनोपलप्रमाणेंच आशियाखंडांतही आपलें वर्चस्व स्थापून हिंदुस्थानचा सुपीक मुलूख गिळंकृत करावा अशी राशियाची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे, या रशियन बागुलबोवाच्या भीतीनें ब्रिटिश मुत्सद्यांस हिंदुस्थानच्या वायव्येकडील अफगणिस्थान, वगैरे बारक्या बारक्या राष्ट्रांशीं सख्य करावें लागून रशियाच्या महत्त्वा- कांक्षेस अडथळा आणावा लागला. रशियाचा बागुलबोवा. एकोणिसाव्या शतकांत युरोप व आशिया या दोन्ही खंडांत राशि- याचें बरेंच प्रस्थ माजत चाललें होतें. सोळाव्या शतकांत राशयास तार्त- रीच्या सुलतानाचें दास्यत्व पतकरावें लागलें असून तेथील आचारविचार